डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत नियम न पाळता ग्रुप डान्स केल्यामुळे 15 जनावर गुन्हे दाखल

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.15एप्रिल):-14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर गंगाखेड या ठिकाणी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी करोनाची साखळी तोडण्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, एकत्र न जमणे असे आदेश दिले.

असताना या नियमाचे उल्लंघन करून रात्री आठ वाजता दोन साऊंड लावून ग्रुप डान्स केल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर यांच्या आदेशाने पोलिस आमलदार चंद्रशेखर कावळे यांच्या फिर्यादीवरून सत्यपाल साळवे, चैतन्य साळवे, चंदा बाळा साळवे, श्री साळवे, विजय साळवे व इतर दहा जणांना वर कलम 188, 269, 270, कलम 51 (B) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 सह साथीचा रोग प्रतिबंधक अधिनियम 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

क्राईम खबर , महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED