धरणगाव तालुका शिक्षक संघटनांचा सामाजिक उपक्रम

25

🔹धरणगांव ग्रामीण रुग्णालयाला ८ ऑक्सिजन (जंबो) सिलेंडर भेट….

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.16एप्रिल):- येथील विविध शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आज दि. १६ एप्रिल, २०२१ शुक्रवार रोजी धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील covid – १९ उपचार कक्षाला आठ जंबो ऑक्सीजन सिलेंडर किट सहित भेट देण्यात आले.
मागील २०२० वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना युद्धाच्या लढाईत शासन, प्रशासन, राजकीय, सामाजिक संघटना व समाजसेवक मंडळी अहोरात्र लढून संघर्ष करीत असताना धरणगाव शहर व तालुक्यातील शिक्षक संघटनेचे योगदान असावे या भावनेतून शिक्षक बांधवांनी प्रेरणादायी अनोखा उपक्रम करून कोरोना युद्धात आघाडी घेतली आहे.

विविध शिक्षक संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या उपक्रमात सर्वांनी मिळून स्वयंस्फूर्तीने स्वेच्छेने देणगी जमा केली. स्वेच्छेने देणगीचा रक्कमेतुन धरणगाव ग्रामीण रूग्णालय मध्ये उपचार घेत असलेल्या कोवीड संसर्जीत रूग्णांचा सेवेत प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बन्सी यांच्या उपस्थितीत दीड लाखाचे ८ जम्बो सिलेंडर व किट देण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्याची मुख्य संकल्पना सी. के.पाटील सर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सांगितली, व वरील संकल्पना सर्व शिक्षक बांधवांनी मान्य केली.

या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, ना.तहसीलदार प्रथमेश मोहोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सी, डॉ. चंद्रकांत पाटील, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सी.के.पाटील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.एस. पाटील, टी.डी.एफ.संघटनेचे अध्यक्ष डी.एस.पाटील, उपाध्यक्ष पी.डी.पाटील, कैलास माळी, सुनील देशमुख, अनिल सूर्यवंशी, ए.एस.पाटील, लोकमतचे पत्रकार कल्पेश महाजन, एच.डी.माळी, तुषार नाईक, नारायण वाणी, यु.एस.बोरसे, डी.के.चौधरी, अनिल पाटील, व्ही.टी. पाटील आदी शिक्षक सर्व पत्रकार बांधक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाला ता. मुख्याध्यापक संघ, ता. माध्यमिक शिक्षक संघ, ता. टी.डी.एफ. शिक्षक संघ, कनिष्ठ महाविद्यालयीन संघ, खाजगी प्रा.शिक्षक संघ, ता. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू – भगिनींचे सहकार्य लाभले.