सस्तेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शासनाचे सर्व नियम पाळत भिम जयंती उत्साहात साजरी

✒️फलटण(पुरोगामी संदेश नेटवर्क)

फलटण(दि.१६एप्रिल):-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० जयंती निमित्त त्यांना सस्तेवाडी ग्रामपंचायत तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. सस्तेवाडी वि.का.स.सेवा सोसायटीचे मा.संचालक विजयराव सस्ते यांच्या हस्ते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

सरपंच ज्ञानेश्वरी कदम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरीत्रावर थोडक्यात प्रकाश टाकला व त्यातुन प्रेरणा घेत प्रत्येकाने शक्य त्या प्रकारे समाज घडवण्यात योगदान देण्याचे आवाहन केले. संचालन व प्रस्तावना उपसरपंच बापुराव शिरतोडे यांनी केले.

सदर वेळी सस्तेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सुनिल वाबळे, प्रताप सस्ते, पत्रकार गौतम भोसले, राजेंद्र कदम, ॠषिकेश वाबळे, गणेश मदने, धनजंय चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.शासनाचे सर्व नियम पाळत सस्तेवाडी ग्रामपंचायतीत भिम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED