लॉकडाऊन मुळे गावाकडे परतणाऱ्या निराधार महिलेला मातृभूमी फाऊंडेशन, पुसद चा आधार

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.16एप्रिल):- येथे दि 15.04.2021
वाशीम रोड वरील रेस्ट हाऊस जवळ एक निराधार घाबरलेल्या अवस्थेत बसलेली महिला खचुन गेलेली दिसुन असल्याचे विठ्ठल डाखोरे यांनी मातृभूमी फाऊंडेशन चे सचिव विशाल कांबळे यांना फोन करून कळविले तिथे जाऊन विचारपूस केली असता सदर महिला वय वर्ष 30 राहणार सोनपेठ धारसु तालुका परळी कवड गाव तांडा जिल्हा बीड येथील रहिवासी आहे असे कळले सदर महिला भंडारा येथील कारखान्यात कामगार होती तिचा सोबतीची तिला सोडून निघून गेल्याचे कळाले.

आदर्श नगर मधील नागरिकांनी सदर महिलेला जेवण दिले नंतर विशाल कांबळे यांच्या आवाहन वरून काही रक्कम जमा करण्यात आली व सदर महिलेला तिच्या गावी सुखरूप पोहचविण्यात आले.ह्यामध्ये डॉ पंकज जयस्वाल,विठल डाखोरे गणेश राठोड विनोद चव्हाण अमोल कानडे अरविंद चव्हाण मयूर राठोड सिद्धार्थ हटकर संतोष पांढरे साजन राठोड दिगंबर इंगळे ड्रायवर सचिन राजधड ठाकूर यांचे सहकार्य केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED