डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध – अनिल जवादे

28

✒️इकबाल पैलवान(वर्धा,जिल्हा प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.16एप्रिल):-मंगळवार दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता एक कुटुंब डॉक्टर निर्मेश कोठारी यांच्या दवाखान्यात आले असता त्यांच्या मुलाने डॉक्टर कोठारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली सदर मुलाचे वडील मरण पावले त्याचे दुःख त्याला झाले हे स्वाभाविकच आहे. परंतु याचा राग सदर डॉक्टर वर काढून त्यांना मारहाण करणे हे अयोग्य व माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा घटना जर शहरांमध्ये होत राहिल्या तर व वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जर संपावर गेले तर याचा सर्वात जास्त परिणाम सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर होईल. सध्याचा काळ हा कोरोना महामारी चा आहे अशा नाजूक परिस्थिती मध्ये जर डॉक्टरांवर हल्ले होत गेले तर शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती फारच गंभीर आहे म्हणून या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे व दोषी असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच परंतु सोबतच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा देणे हे सुद्धा गरजेचे आहे.

डॉक्टरांची सुरक्षा जर आपण करू शकलात तरच या शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था राहील अशा प्रकारचे निवेदन विदर्भ विकास आघाडीचे संस्थापक अनिल जवादे यांनी माननीय श्री उपविभागीय अधिकारी साहेब हिंगणघाट यांना ई-मेल पाठवून केले तर ठाणेदार साहेब हिंगणघाट यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन सादर केले ठाणेदार साहेबांनी यावर योग्य तोडगा काढून एक पथक तयार करून सर्व डॉक्टरांना तो नंबर वितरित करतो व शहराची सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन श्री अनिल जवादे यांना दिले. यावेळी अनिल जवादे यांच्यासोबत विदर्भ विकास आघाडीचे महेश माकडे, दिनेश वाघ राजेश कुरेकार, जयंत धोटे, अजय मुळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते