भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समतेची शिकवणुक स्विकारणे हीच खरी आदरांजली – संजय गजपुरे

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड(दि.16एप्रिल):-भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनाचे औचित्य साधुन नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथील बौध्द विहारासमोरील चावडीचे लोकार्पण जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्कालिन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मंजुर केलेल्या खनिज विकास निधीतुन तसेच खासदार अशोकभाऊ नेते व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनात जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याने नवेगाव हुंडेश्वरी येथील सदर काम पुर्णत्वास नेण्यात आले.

या चावडीच्या लोकार्पण प्रसंगी संजय गजपुरे यांनी जनतेला दिलेला शब्द पुर्ण होत असल्याचा आनंद व्यक्त करीत भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समता व बंधुत्वाची शिकवण स्विकारणे हीच खरी आदरांजली या महामानवाच्या जयंतीदिनी योग्य ठरेल असे प्रतिपादन केले.यावेळी संजय गजपुरे यांच्या हस्ते निळ्या झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले तसेच तथागत भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

याप्रसंगी नवेगाव हुंडेश्वरी च्या सरपंच सौ.कलुबाई नेवारे , उपसरपंच मंगल बुराडे, पोलीस पाटील सौ.शारदाताई चौधरी, कृऊबास संचालक धनराज ढोक, शक्ती केंद्र प्रमुख गुरुदेव नागापुरे, वनरक्षक पाटील , बौध्द कमेटीचे अध्यक्ष रविंद्र लिंगायत , कैलास भाऊ सोनुले , दिवाकर घोरमोडे, राजुभाऊ सोनुले यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी उपसरपंच सौ.आशाताई चहांदे व त्यांच्या चमुने बुध्दवंदना व भीमगीत गायले. कार्यक्रमाचे संचालन प्रितम गाडगे यांनी केले तर आभार ग्रा.पं.सदस्य सतिश गायकवाड यांनी मानले.
============

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED