बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.17एप्रिल):-गत आठवड्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले असतांनाच गुरुवारी पुन्हा एक बालविवाह रोखण्यात आला. जिल्ह्यातील चूरमुरा ता. उमरखेड येथील वय वर्ष 16 असलेल्या बालिकेचा बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. माहितीच्या आधारे बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले.

सदर बाल विवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्ता वनिता शीरफुले,समुपदेशक शिरीष ईगवे, गावातील उपसरपंच अर्जुन जाधव, ग्रामपंचायत सदस्य किरण दवणे, उमरखेड पोलिस स्टेशनचे अधिकारी संजय चौबे, पोलिस शिपाई रवि चव्हाण , पोलिस पाटील नारायण पवार, प्रवेक्षिका खरातडे यांच्या उपस्थितीत पार पडली

क्राईम खबर , महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED