जनहित याचिकेतुन शासनाच्या प्रकल्पात केलेली चोरी आकृती विकासकाच्या घशातून ओढून काढनार – पँथर डॉ.राजन माकणीकर

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.17एप्रिल):-झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत शासनाच्या प्रकल्पात आकृती विकासक विमल शहा यांनी केलेली चोरी जनहित याचिके मार्फतीने त्याच्या घशातून ओढून काढणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर व त्यांचे सहकारी महासचिव श्रावण गायकवाड या दोन रिपब्लिकन पँथर्स नि मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरातील नवव्यांनव हजार एकशे चोवीस (९९१२४.३६) स्केअर मीटर जागेवरील आकृती विकासका मार्फत झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत चाललेल्या प्रकल्पात काही एमआयडीसी व पोलीस दलाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रचंड चोरी केली असून ती उघड करण्यासाठी रणशिंग फुंकले आहे.

सदर प्रकरणी जनआंदोलन उभारले असून अनेकदा तक्रारी देऊनही विविध प्रकारचे आंदोलन करूनही या विकासकावर लगाम लावण्यास एमआयडीसी व पोलीस प्रशासन असमर्थ ठरले आहे.

काही भ्रष्ट अधिकारी व स्थानिक ४२० माजी नगरसेवक मुर्जी पटेल याला हाताशी धरून पोलीस स्टेशन बांधून विकासक आपली मनमानी करत असल्याची माहिती सुद्धा यावेळी त्यांनी दिली.

आंदोलन दाबण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या, नोटिशी व प्रलोभने दिली जात असून अश्या पोकळ धमक्या आणि प्रलोभणाला बळी पडणार नसून माझ्यासारख्या स्वाभिमानी आंबेडकरी अनुयायला विकत घेण्याची लायकी विमल शहा किंवा त्याच्या दलालात नसून गोळी घालुन ठार केले तरच माझा आवाज बंद होईल अन्यथा विमल शहा व त्याच्या चोर साथीदाराला नागडे केल्याशिवाय गप्प राहणार नसल्याची प्रतिक्रिया डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली.

इज्जत असणाऱ्यांनी अब्रू नुकसानीचा दावा करावा, न्यायालयात ये, तुझ्या आहे त्या अब्रु चे धिडवडे नाही काढले तर याद राख, प्रकल्पातील चोरीचे सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत, प्रसंगी जनहित याचिकेच्या माध्यमातून तुला नागडे करेन, असा इशारा डॉ. राजन माकणीकर यांनी यावेळी आकृती विकासकाला दिला.

महाचोर विमल शहा यांचे विरुद्ध जनहित याचिका दाखल करून झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराला बाहेर आणून महादलाल झोलर मुर्जी पटेल याची पटेलिही लवकरच न्यायालयाच्या माध्यमातून जेरबंद करणार असल्याची माहिती डॉ माकणीकर व श्रावण गायकवाड यांनी दिली.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED