प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने फुटपाथवरील कुटुंबाना नास्ता व आर्थिक मदत

✒️ठाणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

ठाणे(दि.17एप्रिल):- ‘ब्रेक दि चैन ‘ कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे. पण या संचारबंदीचा फटका फुटपाथवरील कुटुंबाना बसल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने संचारबंदी व कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून ठाणे येथील साई बाबा मंदिर, वर्तकनगर व इतर ठिकाणी फुटपाथवर जीवन जगणा-या ३०० कुटुंबाना नास्ता व आर्थिक मदत करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, ठाणे जिल्हा युवा महिलाध्यक्षा ज्योती अहिरे, पत्रकार अभिजीत मोपकर, पत्रकार नितीन सागवेकर आदी पदाधिका-यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रातील पत्रकार, त्यांचे कुटुंबीय व इतर गोर गरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करीत आहे. ज्यांच्या हातातोडांची गाठच पडत नाही असे फुटपाथवर आपलं आयुष्य संघर्षमय पद्धतीने जगणा-या कुटुंबाना मदतीचा हात देण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सातत्याने पुढाकार घेत आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र व देशभरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED