अन्यथा पिक विमा कंपनीच्या कार्यालयात ठीय्या अंदोलन करु-शिरीष भोसले यांचा ईशारा

47

🔸खरीप पिकांचा विमा वाटप तात्काळ सुरु करा-शेतकरी संघटनेची मागणी

✒️बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बीड(दि.17एप्रिल):-अतीवृष्टीच्या पावसामुळे यंदा खरीप पिके पुर्णपणे जमीनदोस्त झाली होती व शासनाने देखील पंचनामे करुन नुकसानभरपाई बरोबरच पिक विमा देखील मीळणार म्हणून जाहीर केले होते व त्या अनुषंगाने शासनाने आपल्या हिस्स्याचा पिक विमा हफ्ता पिक विमा कंपनीला अदा केलेला आहे,परंतु विमा कंपनीच्या निष्क्रिय कारभारामुळे अद्याप सुद्धा विमा वाटप झाला नाही त्यामुळे जर का लवकरात लवकर विमा वाटप सुरु केले नाही तर पिक विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकर्यांसह ठिय्या अंदोलन करणार असल्याचा ईशारा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिरीष भोसले यांनी दिला आहे.

या वर्षी खरीपा बरोबरच रब्बी हंगामाची सुद्धा पुर्णपणे वाट लागली असुन खरीपातील मुग,कापुन,सोयाबीन, तुर, बाजरी हि पीके तर पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेला गहु,हरभरा,कांदा तसेच बाजरी व इतर फळबागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन या गारपीटीच्या पावसामुळे पुर्ण रब्बी पीके मातीमोल झालेली आहेत.या अस्माणी संकटामुळे शेतकरी राजा पुर्णपणे हवालदिल झाला आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकारने व विमा कंपनीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विमा वाटप करुन तुर्त दिलासा देणे गरजेचे आहे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरीष भोसले यांनी केली आहे.

गेल्या वर्षभरापासुन चाललेल्या लाॅकडाउनमुळे शेतकर्यांच्या सगळ्या आर्थिक नाड्या बंद झाल्या आहेत तरीसुद्धा उदार मणाच्या बळीराजाने पुर्ण जगाला बसुन खाऊ घातले आहे,
या लाॅकडाउनमुळे जगाचा आर्थिक दर पुर्णपणे ढासळला होता परंतु फक्त शेतीच्या व्यवहारामुळे तो जिवंत आहे.त्यामुळे अशा संकटाच्या समयी जर का सरकार शेतकर्यांचा अंत बघणार असेल तर शेतकरी या राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.त्यामुळे अशा संकटग्रस्त काळात शासनाने हस्तक्षेप करुन पिक विमा कंपनीला विमा देण्यासाठी भाग पाडावे व शेतकर्यांची आर्थिक घडी सुरळीत करावी जेणेकरून पुढच्या हंगामाच्या मशागतीची तयारी करणे सोयीस्कर ठरेल.

खरीपा बरोबरच रब्बी हंगाम सुद्धा निसर्गाच्या लहरीपणामुळे हीराऊन गेला आहे.उत्पादन खर्चाची सुद्धा पुर्तता न झाल्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे शेतकर्यांचे पोट हे शेतीतल्या उत्पादनावर भरत असल्यामुळे आता दैनंदिन खर्चाची सुद्धा घडी विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,अशा परिस्थितीत सरकारने जर हस्तक्षेप केला नाही तर शेतकर्यांच्या आत्महत्या वाढतील त्यामुळे सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे व वेळीच हस्तक्षेप करुन या घडीला विमा कंपनीला विमा देण्यासाठी भाग पाडावे अन्यथा शेतकरी विमा कंपनीच्या कार्यालयात बसून विमा वसुल करतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरीष भोसले यांनी दिला आहे.