चंद्रपूर जिल्ह्यात (दि.17एप्रिल) रोजी 24 तासात 549 कोरोनामुक्त 1593 कोरोना पॉझिटिव्ह – 23 कोरोना बधितांचा मृत्यू

96

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.17एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 549 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1593 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 40 हजार 647 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 30 हजार 103 झाली आहे. सध्या 9969 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 24 हजार 945 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 77 हजार 424 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये वरोरा येथील 50 व 55 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, एकार्जूना, वरोरा येथील 53 वर्षीय पुरुष, गोरवट ता. चिमूर येथील 54 वर्षीय पुरुष, चंद्रपूर येथील 70 वर्षीय पुरुष, पथारी ता. सावली येथील 65 वर्षीय पुरुष, तळोधी, ता. चंद्रपूर येथील 66 वर्षीय पुरुष, सुनयना नगर चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला, मालविय वार्ड वरोरा येथील 74 वर्षीय महिला, चंद्रपूर येथील 60 व 68 वर्षीय पुरुष, वार्ड नंबर 3, गोंडपिंपरी येथील 38 व 61 वर्षीय पुरुष, चेक बोरगाव येथील 50 वर्षीय महिला, गुरुदेव नगर धोपटाला राजुरा येथील 58 वर्षीय पुरुष, पंचायत समिती नागभिड येथील 49 वर्षीय पुरुष, वडसा येथील 43 वर्षीय पुरुष, वडाला पायकू, चिमूर येथील 50 वर्षीय महिला, शेडगाव ता. चिमूर येथील 70 वर्षीय पुरुष, गांधी नगर ब्रह्मपुरी येथील 76 वर्षीय पुरुष, मेंडकी येथील 66 वर्षीय पुरुष व कुर्झा ता. ब्रह्मपुरी येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 575 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 527, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आलेल्या 1593 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 381, चंद्रपूर तालुका 81, बल्लारपूर 67, भद्रावती 72, ब्रम्हपुरी 181, नागभिड 112, सिंदेवाही 109, मूल 46, सावली 21, पोंभूर्णा 9, गोंडपिपरी 20, राजूरा 47, चिमूर 217, वरोरा 128, कोरपना 73, जीवती 12 व इतर ठिकाणच्या 17 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात पंधरा मृत्यूसह आज(17 एप्रिल) 466 नवीन कोरोना बाधित तर 218 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.17एप्रिल):-आज जिल्हयात 466 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 218 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 14485 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11466 वर पोहचली. तसेच सद्या 2819 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 200 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 15 नवीन मृत्यूमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कढोली येथील 66 वर्षीय पुरुष, गडचिरोली जिल्ह्यातील गोकुलनगर येथील 43 वर्षीय महिला, गडचिरोली येथील नवेगाव कॉम्पलेक्स येथील 63 वर्षीय पुरुष, कुरखेडा तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष, चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका नागभिड येथील 55 वर्षीय पुरुष, जिल्हा भंडारा ता. पवनी येथील 35 वर्षीय पुरुष , जिल्हा भंडारा ता. लाखांदुर येथील येथील 35 वर्षीय महिला, ता.कुरखेडा येथील 53 वर्षीय महिला, जिल्हा गडचिरोली गोकुलनगर येथील 48 वर्षीय पुरुष, आरमोरी तालुक्यातील 56 वर्षीय पुरुष, जिल्हा चंद्रपूर ता. ब्रम्हपुरी येथील 58 वर्षीय पुरुष, आरमोरी तालुक्यातील 60 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 48 वर्षीय महिला, गडचिरोली येथीलच 55 वर्षीय पुरुष तर जिल्हा भंडारा तालुका लाखांदुर येथील 60 वर्षीय महिलेचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.16 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 19.46 टक्के तर मृत्यू दर 1.38 टक्के झाला.

नवीन 466 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 196, अहेरी तालुक्यातील 33, आरमोरी 35, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी तालुक्यातील 24, धानोरा तालुक्यातील 8, एटापल्ली तालुक्यातील 21, कोरची तालुक्यातील 33, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 44, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 14, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 11 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 42 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 218 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 81, अहेरी 23, आरमोरी 11, भामरागड 30, चामोर्शी 06, धानोरा 13, एटापल्ली 13, सिरोंचा 12, कोरची 9, कुरखेडा 3, तसेच वडसा 17 येथील जणांचा समावेश आहे. ****