आऊटलूक ने ” शिवी” हासळली

अपमान करायचा मात्र त्याची जाणिव होऊ द्यायची नाही असा पवित्रा घेत ब्राम्हण्यवादी इतरांना अपमानीत करतात,वेळ निघून गेल्या नंतर त्याचा परिणाम समाज मनात उमटतो असा हा मानसशास्त्रीय प्रयोग ब्राम्हण्यवादी नेहमीच करीत आले आहेत…!!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी “आऊटलूक” या ब्राम्हण्यवादी मानसिकतेच्या मासिकाने ५० प्रतिभावंतांची यादी जाहीर केली मात्र त्या ५० प्रतिभावंतांना “दलित ” असे नामाभिधान केले…!!

दलित या शब्दाची व्याख्या करतांना सुप्रिम कोर्टाने दलित म्हणजे हलकट भाव निर्माण करणारा शब्द,एका अर्थाने ती शिवीच आहे असा त्याचा भावार्थ, अशी त्याची व्याख्या केली आणि म्हणूनच मग त्या शब्दांला प्रतिबंध सुद्धा केला आहे….!!
आऊटलूक मध्ये बसलेल्या विचारवंतांना ही बाब माहिती नाही काय…??माहिती असुनही जाणिवपूर्वक “दलित” शब्दाचा वापर करणे म्हणजे शिवी हासळणे नव्हे काय…..??

ब्राम्हण्यवादी प्रसार माध्यमांमध्ये बसलेल्या माजोरीचा हा नमुना आहे आणि म्हणूनच मग या माजोरीला सडेतोड उत्तर दिले पाहिजे तरच मनुवादी ताळ्यावर येतील किंवा पुन्हा हलकट संबोधन वापरण्याची हिंमतच करणार नाहीत….!!प्रत्येक आंबेडकर वादी प्रतिभावंतांनी जाब विचारला पाहिजे अन्यथा आंबेडकरवादी विचारधारेला वेळोवेळी शिव्या देण्याची मुजोरी हे विद्वेषी लोक करीतच राहतील…!!दिशा पिंकी शेख आणि कडुबाई खरात यांनी सुरुवात केली आहे…!!आरे ला कारे म्हणायची हिम्मत बाळगली पाहिजे हा स्वाभिमानी बाणाच तुमची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख निर्माण करेल,अन्यथा ब्राम्हण्यवादी तुम्हाला वैचारिक गुलाम करायला सज्ज झाले आहेत…!!

जयभीम.

✒️लेखक:-भास्कर भोजने सर
(आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक अकोला)मो- 99602 41375

▪️संकलन:-नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी, बीड जिल्हा)मो- 8080942185

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED