पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून केली जनजागृती

80

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी वैजनाथ(दि.18एप्रिल):-तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन अँक्शन मोडवर आले असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार स्वतः हाँटस्पाँट बनलेल्या नागापूर येथे सभापती बालाजी मुंडे यांनी स्वतः जावून गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच गावातील नागरिकांना अँटीजेन टेस्ट तपासणी करण्याचे आवाहन केले. तसेच गावातील घरोघरी जाऊन देखील नागरिकांनी स्वतः घराबाहेर पडून तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अँटिजन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रशासन चांगलेच गंभीर झाले. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार सरपंच मोहन सोळंके, पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे यांनी उपाययोजना करत शनिवारी (ता.१७) नागापूर गावात अँटीजेन तपासणी कँम्प लावला असून गावातील प्रत्येक घरात अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी अँटीजेन तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे.

या तपासणी कँम्पला दुपारी एकच्या सुमारास सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, पंचायत समितीचे सदस्य माऊली मुंडे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढाव घेतला आहे. यावेळी गावचे सरपंच मोहन सोळंके व सभापती बालाजी मुंडे यांनी स्वतः गावात फिरुन जास्तीत जास्त नागरीकांनी अँटीजेन तपासणी करून घ्यावी व कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेची गंभीरता समजून सांगत जनजागृती केली. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व नागरिक चिंतेत असताना पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या आवाहनानुसार सभापती बालाजी मुंडे व गावातील कोरोनाची साखळी तुटावी यासाठी सरपंच रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहेत. स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी सरपंच मोहन सोळंके यांनी कोरानाविषयक गावातील उपाययोजना व खबरदारीची माहिती दिली. तसेच यासंदर्भात सभापती बालाजी मुंडे यांनी सांगितले की, तालुक्यातील नागरीकांनी वाढत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व गावातील नागरीकांनी शासकीय नियमांचे पालन करावे तसेच मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करावे. नागरिकांनी , गावात ग्रामपंचायतने जनजागृती करावी, गावातील प्रत्येक नागरीकांनी मास्क वापरावे, पारावर, ओठ्यावर एकत्र जमू नये, गर्दी करून नये, लाँकडाऊनच्या नियमांचे पालन करावे व वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग रोखावा व जास्तीत जास्त नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन यावेळी सभापती मुंडे यांनी यावेळी केले.