म्हसवड शहरात आजपासून “जनता कर्फ्यु” लागू

32
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

माण(दि.18एप्रिल):-तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता आणि म्हसवड शहरात रुगणाच्या संख्येत होणारी वाढ पाहता दहिवडी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी म्हसवड येथे तालुका आरोग्य अधिकारी,नगराध्यक्ष आणि व्यापारी यांची बैठक घेऊन काल रात्री आठ वाजले पासून म्हसवड शहर “कंटेन्मेंट झोन” जाहीर केले असून आजपासून पुढील आदेश येईपर्यत शहरात संचारबंदी आणि जमाव बंदी लागू केली आहे.

म्हसवड शहरात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून मृत्यूचेपन प्रमाण वाढले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी “ब्रेक द चेन” म्हणून 14 एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून राज्यात सचारबंदी आणि जमावबंदी लागू केली होती.

परंतु शहरातील नागरिक विनाकारण फिरताना दिसत होते त्यामुळे बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यामुळे कोरोनाचा प्रसार शहरात वेगाने वाढू लागला त्यामुळे स्प्रेडचे रूपांतर सुपरस्प्रेड मध्ये होऊ लागले.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनासंदर्भातील निर्णय हे लोकल प्रशासनाने घेण्याचे सांगितले असल्यामुळे काल प्राताधिकारी यांनी म्हसवड शहरात “जनता कर्फ्यु” जारी केला असून म्हसवड शहर “कंटेन्मेंट झोन” म्हणून घोषित केले आहे.

शहरात कनटेन्मेंट झोनच्या पार्श्वभूमीवर म्हसवड नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्ते हे बेरिकेट्स लावून बंद केले आहेत आणि म्हसवड पोलीस स्टेशन कडून कडक बंदोबस्त लावला असून शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे आणि त्याच्याकडून दण्डही वसूल केला जात आहे.म्हसवड नगरपरिषदेकडून जाहीर आवाहन करणेत येत आहे विनाकारण शहरात फिरू नये,मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सीगचे पालन करावे.