असंघटीत कामगारांना सरसकट आर्थिक लाभ देण्यात यावा

29

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.18एप्रिल):-लाखो असंघटीत इमारत बांधकाम कामगारांची नांव नोदणी झालीच नाही.२०१९ ला निवडणूक होती अधिकाऱ्यांना स्पेशल दिवटी होती.कार्यलयात कायम कामगार नाहीत.बी ओ सी वाल्यांची मनमानी अनेक कामगारांची मोठ्या कसरती करून नांव नोंदणी झाली त्या कामगारंच्या नांव नोंदणीचे नूतनीकरण २०२० ला झाले नाही.गेले वर्ष लॉक डाऊनमुळे कार्यालय बंद होती आणि ऑनलाईन नूतनीकरण करतांना सर्व्हेवर लोड घेत नव्हता अशा अनेक अडचणीला कामगारांना तोंड द्यावे लागत होते.त्यातच भाजपा लोकप्रतिनिधीच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात बोगस नांव नोंदणी होत होती.म्हणूनच शासनाने सुरक्षा कीट वाटप बंद केले होते. त्याविरोधात अनेक संघटनांनी लेखी तक्रारी केल्या होत्या.मोर्च्या आंदोलने केली होती.

सरकारने प्रशासकीय अधिकारी वर्गाने फारशी योग्य ती दखल घेतली नाही. थातूर मातुर उतरे देऊन असंतोष शांत केला. खरा असंघटीत इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यापासून आणि लॉक डाऊन मध्ये देण्यात आलेल्या आर्थिक लाभा पासून वंचित राहिला आहे. त्यामुळे असंघटीत कामगारा मध्ये प्रचंड असंतोष आहे.सलून कामगार,दुकान कामगार,हॉटेल कामगार,ग्ररेज कामगार,फेरीवाला,घरकामगार,कचरा वेचक,यांची रीतसर नांव नोंदणी होतच नाही त्यांना कसा लाभ मिळेल.त्यांची निपक्षपणे पाहणी करून आर्थिक मदत देण्यात यावी.

म्हणनूच आपणास सत्यशोधक कामगार संघटनेच्या वतीने नम्र विनंती आहे कि खऱ्या असंघटीत नाका कामगार,इमारत बांधकाम कामगारांसह इतर सर्व असंघटीत कामगारांना सरसकट आर्थिक लाभ देण्यात यावा. आणि गोर गरीब आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत देऊन कुटुंबातील भूकबळी टाळण्यात यावा असे निवेदन सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन यांनी माननीय मुख्यमंत्री यांना इमेल द्वारे दिले आहे.