हिंगणघाट येथे दहा खाटांच्या कोविड रुग्णालयाला माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या प्रयत्नाने मंजुरी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१८एप्रिल):-सातत्याने कोरोनाचा प्रधुर्भाव वाढत असतांना हिंगणघाट येथे कोविड हॉस्पिटल ची मंजुरी दिली जावी असी मागणी वर्धा जिल्हाधिकारी यांचेकडे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केली होती. त्या मागणीचा सतत पाठपुरावा करून आज या मागणीला मंजुरी प्राप्त झाली असून आता दहा रुगणाचा इलाज अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर व मरोठी हॉस्पिटल हिंगणघाट येथे केला जाणार आहे . आज या कोविड सेंटरची मंजुरी प्राप्त झाली आहे.

या पर्यंतची पराकाष्टा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केली असून या रुग्णालयाला मंजुरी प्राप्त करण्याकरिता पालकमंत्री सुनील केदार अप्पर जिल्हाधिकारी श्री.अशोक लटारे ,आर डी सि मोरे (मॅडम),जिल्हा शल्यचिकिसक श्री.तडस तसेच हिंगणघाटचे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर चाचरकर यांनी मोलाचे सहकार्य केले या रुग्णालयात हिंगणघाट येथील डॉक्टर मारोठी, डॉक्टर मानधनिया, डॉक्टर गमे,डॉक्टर सौ.मानधनिया आणी इतर कर्मचारी काम करणार आहे. या हॉस्पिटलच्या मंजुरीने परिसरातील जनतेला मोठा दिलासा मिळणार असे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी व्यक्त केले आहे.

——————————————

प्रतिक्रिया:- आता सुरुवातीला दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आता पुढे पुन्हा किमान ३० ते ३५ पर्यंत वाढीव बेड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जनतेला याचा दिलासा मिळणार आहे. कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जनतेने आपली स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
– माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED