महिला बचत गटाची व शासकीय-निमशासकीय इतर वसुली थांबवा – सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण नायगांवकर

26

✒️नायगांव प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)संपर्क:-९९६०७४८६८२

नायगाव(दि.19एप्रिल):- नांदेड जिल्ह्यासह नायगांव शहर व तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकटात नागरीक सापडले आहेत सामान्य नागरिकांचे हातावरचे पोट असून या कुटुंबप्रमुखाच्या मागे त्याचा परिवार अवलंबून आहे सदर यामध्ये मजदूर, कामगार, शेतमजूर, विविध क्षेत्रातील मुनीम, शेतकरी बांधव,छोटे व्यापारी, छोटे हातगाडी चालविणारे व्यापारी,अशा सर्वच बांधवांचे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत यांच्यावर उपासमारीची वेळ आली असता, मायक्रो फायनान्स व इतर शासकीय व निमशासकीय तसेच भांडवलदारांनी वसुलीचा तगादा लावला आहे हा वसुलीचा तगादा थांबणे अत्यंत गरजेचे आहे, यामुळे थकबाकीदाराना मानसिक त्रास होत आहे.

त्यानंतर कोरोनाची भीती त्यानंतर सर्व सामान्य नागरिक यांच्या डोक्यावरील होणाऱ्या परिणाम यास कोण जबाबदार आहे,कारण मा जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी दिनांक २५ मार्च २०२१ रोजी लाॅकडॉऊन केल्यापासून आज तागायत पर्यंत व पुढील कोरोनाची परस्थिती सुधारेपर्यंत या विषयास गांभीर्याने मा. तहसीलदार साहेब नायगांव व मा.जिल्हाधिकारी साहेब या संबंधित मायक्रो फायनान्स अंतर्गत कर्जदार महिला बचत गट तथा व शासकीय-निमशासकीय भांडवलदारांनी वसुलीचा तगादा लावला आहे , तसेच कोरोनाच्या संकट काळात थकबाकीदाराना होत असलेला मानशीक त्रास थांबवून न्याय द्यावा.

या मागणी चे निवेदन तहसीलदार साहेब नायगांव यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या निवेदनाद्वारे करण्यात आले, निवेदन वर स्वाक्षऱ्या देवीदास पाटील बोमनाळे, भाऊराव पाटील चव्हाण, रघुनाथ भाऊ सोनकांबळे, गजानन पाटील चव्हाण, गंगाधर पाटील कल्याण, राजूभाऊ सोनकांबळे, धनंजय चव्हाण, गणेश पाटील देगांवे, यांच्या आहेत,