खाद्येतेलाचे भाव १४५ ते १५० भावाने सरास विक्री गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले

30

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.19एप्रिल):-लाँकडाऊनच्या काळात खाद्येतेलाचे भावा मध्ये वाढ झाल्या मुळे गोरगरीब जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे .
कोरोना महामारी वाढत असताना.लाखो लोक कोरोना महामारीचा सामना करीत असताना. आज पैसे कमावण्यासाठी गुंतवणूक दार मोठ्या प्रमाणात पैसा कमावत असल्याचे चित्र दिसत आहे. आज कोरोना महामारी पेक्षा दुसरी आर्थिक महागाई मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या मुळे गोरगरीब जनतेला जीवन जगणे अवघड आहे.

या मध्ये
(१) घरगुती गॅस सिलिंडर – ८५० ते ९०० भावाने विक्री
(२)पेट्रोल दर- १०० जवळ भावाने विक्री
(३) खाद्यतेल- दर- १४५ ते १६० भावाने विक्री
(४) दाळी चे दर वाढले असून
कोरोना महामारी माणसाला एकदाच मारते.पण महागाईचा कोरोना रोग माणसाला प्रत्येक दिवसाला मारत असताना. दिसत आहे.. याकडे शासनाचे लक्ष देणे गरजेचे आहे.

यावर शासनाने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर कोरोना महामारीच्या काळात किराणा मालाच्या दरात वाढ झाल्याने गोरगरीब जनतेला खाद्य तेल खरेदी करायला तेल १ किलो खरेदीला १४५ रुपये ते १५० रुपये खर्च करावा लागत असल्याने कोरोना काळात गोरगरीब जनतेचा दररोज दिवसाला कमीत कमी ३०० रुपये खर्च आहे.मग एक वस्तू जी दररोज खावी लागते भाजी पोळी साठी खाद्य तेल हे खरेदी करायचे असेल तर १४५ ते १५० रुपये खर्च करून घ्यावे लागते.मग सांगा बाकी वस्तू खरेदी कशा करांयच्या जनतेची व्यथा शासन दरबारी मांडु कशी कोण आमचा विचार करणार आहे..
गोरगरीब जनतेला खाद्य तेल बेभावाने घ्यावे लागत असल्याने जनता हैराण झाली आहे.