चंद्रपूर जिल्ह्यात (दि.19एप्रिल) रोजी 24 तासात 631 कोरोनामुक्त 1213 कोरोना पॉझिटिव्ह – 22कोरोना बधितांचा मृत्यू

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.19एप्रिल):- जिल्ह्यात मागील 24 तासात 631 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1213 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 43 हजार 444 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 31 हजार 281 झाली आहे. सध्या 11हजार 541 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 32 हजार 411 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 81 हजार 856 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील दादमहल वार्ड येथील 60 वर्षीय पुरुष, जे बी नगर येथील 75 वर्षीय महिला, पठाणपुरा वार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 62 वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील 75 वर्षीय महिला, अंचलेश्वर वार्ड येथील 80 वर्षीय महिला, नगीना बाग येथील 50 वर्षीय पुरुष, जटपुरा गेट परिसर येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे तर भद्रावती येथील 69 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील खांबाळा येथील 35 वर्षीय पुरुष व 80 वर्षीय पुरुष. गडचांदूर येथील 56 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील विठ्ठल मंदिर वार्डातील 65 वर्षीय व साईनगर येथील 65 वर्षीय पुरुष,नागभीड येथील 45 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 40 वर्षीय 60 वर्षीय व 50 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 56 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 31 वर्षीय महिला, भंडारा येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 622 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 573, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा तिन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1213 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 70, बल्लारपूर 58, भद्रावती 86, ब्रम्हपुरी 148, नागभिड 25, सिंदेवाही 34, मूल 45, सावली 13, पोंभूर्णा 8, गोंडपिपरी 16, राजूरा 102, चिमूर 93, वरोरा 157, कोरपना 30, जीवती 13 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

🔺गडचिरोली जिल्ह्यात बारा मृत्यूसह आज(19 एप्रिल) 305 नवीन कोरोना बाधित तर 263 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.19एप्रिल):- आज जिल्हयात 305 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 263 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 15314 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11955 वर पोहचली. तसेच सद्या 3134 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 225 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 12 नवीन मृत्यूमध्ये 59 वर्षीय पुरुष, कुरखेडा , 71 वर्षीय पुरुष मड्डीगुडम ता.अहेरी, 45 वर्षीय पुरुष अहेरी , 70 वर्षीय महिला चामोर्शी, 42 वर्षीय पुरुष कोंडाळा ता. वडसा, 60 वर्षीय पुरुष बोलदा ता. वडसा, 38 वर्षीय पुरुष मानपूर ता. आरमोरी, 60 वर्षीय महिला अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया, 60 वर्षीय पुरुष हनुमान नगर , गडचिरोली, 45 वर्षीय पुरुष आरमोरी, 70 वर्षीय महिला विवेकानंद नगर , गडचिरोली , 72 वर्षीय पुरुष कन्नमवार वार्ड गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.07 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 20.46 टक्के तर मृत्यू दर 1.47 टक्के झाला.

नवीन 305 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 184, अहेरी तालुक्यातील 09, आरमोरी 35, चामोर्शी तालुक्यातील 11, धानोरा तालुक्यातील 08, एटापल्ली तालुक्यातील 05, कोरची तालुक्यातील 07, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 16 , मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 07, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 02 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 21 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 263 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 101, अहेरी 11, आरमोरी 19, भामरागड 05, चामोर्शी 11, धानोरा 23 , एटापल्ली 12, मुलचेरा 02, सिरोंचा 05, कोरची 08, कुरखेडा 29, तसेच वडसा येथील 37 जणांचा समावेश आहे.