कोरोना योद्धा म्हणून शिक्षकांना ५० लाख विमा संरक्षण मिळावे शिक्षक भारतीची मागणी

28

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.20एप्रिल):-कोरोना विरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरू आहे त्यासाठी कोरूना विरुद्ध काम करणाऱ्या कोरोना युद्धांना ५० लाखाचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा संरक्षणाचा निर्णय शासनाने घेतला असून शासन निर्णयानुसार कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन पोलीस होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी,लेखा व कोषागारे,अन्न व नागरी पुरवठा,पाणीपुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य कर्मचारी,रोजंदारी कंत्राटी मानसेवी असे सर्व कर्मचारी अशा सर्व घटकांना पन्नास लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

मात्र यात शिक्षकांचा समावेश नाही.या कार्यामध्ये राज्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात गावातील कुटुंबाचे सर्वेक्षण करणे, कंटेनमेंट झोनमधील गावातील चेक पोस्ट चे काम, प्रमुख रस्त्यावर पोस्टचे काम, लसीकरण केंद्रावर लसीकरणाच्या नोंदीचे काम, रेशन दुकानावर वाटपासाठी मदत करणे,वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये विविध संकलन करणे,जागृतीचे काम करणे इत्यादी कामासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्तव्य पार पाडताना काही शिक्षक बांधवांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे त्याचे कुटुंब पोरके झाले असून त्यांचा आधार हरवल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. तरी कृपया कोरोना विरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्धा शिक्षक, कर्मचाऱ्यांना देखील ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिक्षक भारतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजीत पवार यांना केली.

असल्याचे शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर,विभागीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे,सल्लागार धनराज गेडाम,दिवाकर लखमापूरे,राजाराम घोडके,कार्याध्यक्ष जब्बार शेख,सरचिटणीस नंदकिशोर शेरकी,विलास फलके,रावन शेरकुरे,राजेश धोंगडे,विजय मिटपल्लीवार,डाकेश्वर कामडी,कृष्णा बावणे,सुनिल दुर्गे,रविंद्र कोटांगले आदींनी एका पत्रकान्वये कळविले आहे.