नारायणगाव खेरवाडी गावात सात दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू

33

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.20एप्रिल):-निफाड तालुक्यातील खेरवाडी गाव मध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या करुणा आकडेवारी मुळे व गावाच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ, आरोग्य विभाग व तलाठी कार्यालय यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीनुसार करोना साखळी तोडण्यासाठी 7 दिवसाचा जनता कर्फ्यू लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत आरोग्य विभागाने कळविले आहे.

त्यामुळे बुधवार दिनांक 21/04/2021 पासून गुरुवार दिनांक 29/0 4 /2021 पर्यंत गावात कडकडीत बंद असणार आहे.
यादरम्यान अत्यावश्यक सेवा फक्त दवाखाना व मेडिकल वगळून सर्व प्रकारचे भुसार माल किराणा दुकान,हॉटेल व इतर व्यावसायिक दुकाने सर्व या दरम्यान बंद असतील
*जे दुकानदार हॉटेल चालक नियमांचे उल्लंघन करेल सदर दुकानास प्रशासनाद्वारे सील करण्यात येईल याची सर्व दुकानदारांनी नोंद घ्यावी.

तसेच ग्रामस्थांनी आपल्या गरजेच्या वस्तू व किराणा मंगळवार दिनांक 20/04/2021 रोजी घेऊन ठेवाव्या त्यानंतर कुठल्याही प्रकारचे वस्तू 7 दिवस घेता येणार नाही याची नोंद घ्यावी.वाढत्या करुणा प्रादुर्भावामुळे जनता कर्फ्यू चा निर्णय घेणे गरजेचे आहे तरी ग्रामस्थांनी आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासनास सहकार्य करावे व सात दिवस कडकडीत जनता कर्फ्यू चे पालन करावे… कुटुंब प्रमुखाला विनंती आहे की मास, सॅनिटायझर चा वापर करावा व सुरक्षित अंतर ठेवून आपापल्या परिवाराची काळजी घ्यावीग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी कार्यालय, वैद्यकीय अधिकारी नारायणगाव (खेरवाडी) यांनी आवाहन केले