जीव इतका सोपा वाटतो का? महाराष्ट्रातील जनतेचा! – सुनील ठोसर

✒️गेवराई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गेवराई(दि.20एप्रिल):-अतिशय शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत कोरोना दहशत निर्माण झाली असून यातच कोवीड सेंटर वर सर्व सुविधा देण्यास आरोग्य विभाग कमी पडताना दिसत आहेत राज्यातील काही नेते व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तर पुऱ्या लाजा सोडल्या ! वसुली व माफिया सारखे माणसे ठेवली भेट घेतली असता तब्बल ब्लॅक मधे हजारो रुपये प्रती नग सांगतात लाखो रुपयांचा निव्वळ पैसा गोळा केला याचे पुरावे रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला देण्यास आम्ही तयार आहोत ही माणुसकीला काळीमा फासणारी यंत्रणा आहे केंद्रिय आरोग्य अधिकारी मंत्री राज्यातील आरोग्य विभाग तसेच आरोग्य मंत्री तसेच राज्यातील सर्व पालक मंत्री इंजेक्शन व साहित्य खाजकी हॉस्पिटल मध्ये गैर व्यवहार करून दोषी नाहीत का?

धुतल्या तांदळासरखे आहेत का? आपण जनतेचे पालक आहात की भक्षक उत्तर तमाम राज्यातील जनता रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तक्रारी करत असून राज्याच्या आरोग्य मंत्री तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना माझा जाहीर प्रश्न आहे की राज्यात सध्याच्या परिस्थितीत कुठेही एक जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काय केले आजपर्यंत हजारो कोटी रुपयांची मदत झाली, सरकारने बजट दिले याचा हिशोब राज्यातील जनता मागत आहे! आजपर्यंत आकडा सांगता तसा खर्च दाखवा जाहीरपणे मीडिया समोर येवढ्या संकटात ही आपण माणसे ठेऊन लोकांचे हाल होत जीव जात आहेत आपण आपल्या मुंसी मार्फत माया जमा करत आहेत याचे पुरावे मी स्वतः सुनील नानासाहेब ठोसर पाटील जाहीर देण्यास तयार आहे राज्यात सर्वत्र पालक मंत्री आपापल्या सोईनुसार आरोग्य अधिकारी घेऊन हा सगळा डाव साधत आहेत जीव गेला तो सामान्य माणसाचा गरिबाला जीव नाही का?

राज्यात कुठल्या नेत्याने सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले सांगा कोणत्या नेत्याला येवढं दुःख पदरी पडले आमदार निलेश लंके व यांच्या मतदार संघातील अधिकारी सर्वांनी सेंटर मध्ये कायम रुग्णांचे मनोरंजन, तेथेच जेवण, प्रत्येकाची जबाबदारी प्रामाणिक पार पाडली असा एखादा महाराष्ट्रात नेता सापडणार नाही यांचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो
आज सामान्य माणूस जगावे का मरावे या विचारात केवळ आपल्या हरामी पणामुळे आहे हे विसरू नका! राज्यात कुठेही पेशंट तक्रार डायरी आहे का? कुठल्याही पेशंट तब्येत बरी झाली व आरोग्य विभागाने सुट्टी दिली याचा अभिप्राय आहे का? कुठल्या पेशंट साठी आपण आपल्या परीने काय प्रयत्न केला याची व्हिडिओ आहे का? कुठल्या सेंटर साठी किती कॉन्ट्रॅक्टर दोषी असतील अश्या लोकांवर कार्यवाही केली.

याचे उदाहरण म्हणून एक तरी सांगा? किती खाजगी हॉस्पिटल यांचे परवाने रद्द केले सांगा? केवळ दानशूर व राज्याच्या तिजोरीवर आपण राज्यातील या महामारी व परस्थिती गंभीर तिथे सरकार खंबीर या वलग्ना बंद करा आम्हाला सरकारशी व कुठल्याही राजकारणाशी देणे घेणे नाही आमचा कुणाशीही काही सोयरिक नाही आपले प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करणार तर राज्यातील जनतेला सावरण्यासाठी का सरणावर पोहचविण्यासाठी हा प्रश्न राज्यातील विविध सेंटर, विभागातून मरणाच्या वाटेवर असल्यासारखे अनेक बंधू- भगिनींना , अबाल वृद्ध,युवक,युवती,बालमित्र माझ्या संपर्कात आहेत केवळ राज्याचे व केंद्राचे जळो ते राजकारण तुमची टीका टीपणी नको आम्हाला वाचवा हा आवाज राज्यातील विविध सेंटर व बेडवरून येतोय याची जाणीव ठेवा ! याच जनतेने आपणाला अनेक वेळा आमदार मंत्री केलं यात शंका नाही हे तरी उपकार ठेवा आपल्या राजकीय मंडळींच्या राजकीय कुर घोडी विविध माध्यमातून , सत्तेच्या चाव्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण विविध कंत्रादारांकडून मया गोळा करून गोरगरीब जनतेचा जीव घेता यांच्या नावावर मिळणारे साहित्य काही पटीने ब्लॅक मध्ये विकता येवढं दुःख गोरगरीब जनतेला देऊन हे पाप कुठल्या तरी जन्मी फेडावे लागेल हे लक्षात ठेवा!

या सर्व वाटचालीत ७५% राजकीय नेते ५० फुटांवरून सात्वन करत होते हे राज्यातील जनता कदापिही विसरणार नाही विविध नेत्यांच्या पत्रकबजितून पाहिल्यामुळे आयुष्य ज्यांच्यासाठी दिले ते आज सत्तेसाठी,राजकारणासाठी, स्वार्थासाठी दिसतात तर आमच्या आयुष्यात शेवटी अंधार पडला शेवटी आमच्या नशिबात हे फळ आहे हे लक्षात घेऊन शेवटच्या घटका मोजतोय असे दवाखान्यातील रुग्ण बोलत आहेत दोषी असतील अश्यानी जनाची सोडा पण मनाची थोडी लाज ठेवावी हीच भावना बेडवरून आयुष्यातील शेवटच्या क्षणी अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहे आजही विकास कामाचे शुभारंभ करताय! तुमचे समर्थक विकासाच्या वल्गना करताय हे दुर्दैव नाही का? आपापल्या माफिया मार्फत गुत्तेदार, कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्याचे काम जेवढे इमानदारीने करतात तेवढी इमानदारी आरोग्य सेवेची का होईना हा प्रश्न आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेचा आहे? राज्यातील कोणत्या नेता व विरोधक बिल व पगार नको मनाला याचे उत्तर द्यावे केवळ आघाडी सरकार व विरोधक ही नौटंकी बंद करा मरणाच्या वाटेवर पोहचलेल्या जनतेला सुविधा देण्यास सुरुवात करा! मदत छोटीशी राजकीय यंत्रणा करते पण बॅनरबाजीला उधाण येते याच मदतीच्या नावाखाली किती लोकांना वेठीस धरतात हे आम्ही जवळून पाहिले वेळ आल्यास जाहीर करण्यास वळून पाहणार नाही परस्थिती भयंकर आहे.

सामान्य माणूस जिवंत राहणं गरजेचं आहे असून आपल्या चुकीच्या धोरणामुळे…. जमा आहे याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यक्ती, विभाग यांचेवर असून पुढील काळात तुम्हाला ईश्र्वर सुद्धा माफ करणार नाही राज्याच्या व केंद्राच्या माध्यमातून घोषणा केली होती हे आपण सगळे विसरलात का? आरोग्य तथा पोलिस विभागाच्या कुठल्याही ठिकाणी कुठल्याही माणसाला कोरोना मुळे जीव गमवावा लागला तर त्यांच्या कुटुंबीयांना केलेली घोषणा कुठे अमलात आणली हे दाखवा केवळ घोषणा बाजी तुम्ही करता का थोडी शरम वाटते का सांगा! केवळ उठ सुट आरोग्य विभाग व पोलिस यंत्रणेवर राजकीय नेते व सत्तेच्या राजकारणात दबाव तंत्र करतात हे बंद करून थोडी माणूस म्हणून माणसातील देव जागा नाही का? यातच आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकारी आजही कुठलीही जीवनाची,कुटुंबाची, आयुष्याची तमा न बाळगता लढतो तो आपल्या मातीशी नाती सांभाळणारा आरोग्य विभाग व पोलिस विभागातील प्रत्येक माणूस मी पाहिलेला देव माणूस पहिला यांना मानाचा मुजरा करण्यास हरकत नसावी तो या दोन विभागांत अहोरात्र कष्ट करण्याची तयारी सुरू आहे.

राज्यभर नुसते आरोग्य उपकेंद्र गुत्तेदार व स्थानिक अधिकारी यांचे भले व्हावे यासाठी सरकारने प्रयत्न केला असे वाटते मोजके उपकेंद्र सोडले तर बाकी सर्व केंद्र स्मशान, कोंडवाडा झाल्यासारखी परस्थिती झाली असून अनेक ठिकाणी उपकेंद्रात अधिकारी प्राथमिक उपचार मिळत नाही हे सत्य आहे राज्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अम्ही कुठलेही पाऊल टाकणार आहोत शेवटी सामान्य माणूस जगला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो या संकटात सापडलेल्या माणसाचे मृतदेहाचे मगच्याला एक चांगला निर्देश देऊन जाताना दिसत आहेत नसता राज्यभर या सर्व नियमांना बाजूला काढून संताप जनतेचा जीव सामान्य माणसाचा आंदोलन राज्यभर रथयात्रा सुरू करून आरोग्य जनजागृती काढण्यात येईल असे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED