स्वतः अपात्र ठरवूनही सदनिकेचा ताबा देणाऱ्या महाठक विमल शहा ला तात्काळ अटक करा – पँथर डॉ. राजन माकणीकर

36

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.20एप्रिल):- पात्र झोपडीधारकाला अपात्र ठरवून अडीच सदनिकेचा ताबा देऊन पूर्ण FSI चा फायदा घेणाऱ्या महाठक विमल शहा व त्याचा साथीदार मुर्जी पटेल याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली तात्काळ अटक करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

टी एम कांबळे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर व राज्य महासचिव कॅ. श्रावण गायकवाड यांनी न्यायीक हक्कासाठी आंदोलन पुकारले आहे.

एमआयडीसी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत प्रचंड घोटाळा झाला आहे. झोपडीधारकांच्या अनेक समस्या आहेत. आजही बरेच झोपडीधारक सदनिका व भाडे धनादेशापासून वंचित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रकरणाचा पाठपुरावा ही 2 पँथर करत आहेत, लवकरच महाचोर विमल शहा व महादलाल मुर्जी पटेल यांच्या विरोधात न्यायलयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी व पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की,
आपला प्रकल्प चालू होऊन विशी ओलांडली मात्र: आजही बरीच गरीब गरजू सदनिका आणि भाडे धनादेशासून वंचित आहेत. शासन प्रशासन व जनतेची फसवणूक करून त्यांना वेठीस धरले जात आहे.

२००६ मध्ये आकृती /हब टाऊन विकासक या महाचोराने १०७ बोगस पात्र झोपडीधारकांना एमआयडीसी अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांची दिशाभूल करून १०७ जणांना अपात्र ठरवले आहे.

मात्र: अपात्र ठरवून ज्यांची नावे पात्र यादीतून वगळण्यात आली ती कार्यवाही फक्त कागदोपत्रीच जाली वस्तूस्थिती पाहता प्रत्यक्षात वगळण्यात आलेल्या यादीपैकी बऱ्याच लोकांना सदनिकेचा ताबा देण्यात आला होता, त्यांच्या वर कार्यवाही करून त्यांच्या सदनिका परत काढून घेण्यात आल्या नाहीत

एमआयडीसी प्रशासन खरच गाफील आहे की महाचोर विमल शहा प्रशासनाची फसवणूक करतो आहे हा संभ्रम आहे. महादलाल फसवणुकीचा गुन्हस सिद्ध झालेले पडेल भाजपा नगरसेवक मुरजी पटेल या प्रकारचा मास्टरमाईंड असल्याचे तीव्र निदर्शनात येत असून आपक्या मार्फतीने मुरजी पटेल यावर चौकशी बसविण्यात यावी.

आमच्या तक्रारीच्या आधारावर महाचोर विमल शहा याचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा वगळण्यात आलेल्या सदनिका खाली करून घ्याव्यात किंवा FSI मधील सदनिका ताब्यात घ्याव्यात. अन्यथा आंदोलनाचा इशारा डॉ माकणीकर यांनी दिला आहे.