कारला देवस्थान येथील दोघांचा खुन करणाऱ्या आरोपीस 27एप्रील पर्यत पोलीस कस्टडी

24

✒️यवतमाळ जिल्हाप्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.21एप्रिल):-दि.19च्या भल्या पहाटे कारला देवस्थान येथील आरोपी गोकुळ राठोड याने झोंपेत असलेल्या दोघाचा कुन्हाडीने घाव घालुन बळी घेतला आहे,तर पाच जनाना जखमी केले आहे,या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मोतीराम बोडखे यांनी आरोपीस अटक केली आजदि,20एप्रील रोजी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी जी,बी,पवार यांनी खुणातील आरोपी गोकुळ राठोड यास 27एप्रील पर्यत पोलीस कस्टडी मंजुर केली आहे,सरकारी वकीलं राठोड या प्रकरणी युक्तीवाद केला आहे,त्यांनी असे सांगीतले की,आरोपी गोकुळ राठोड यांनी जे दोन खुण केले,एका खुणा नंतर दुसरा खुण झालेला आहे,त्यानंतर सात्यताने कुन्हाडिने घाव घालत पाच जनाना जखमी केले आहे.

त्यामुळे या प्रकरणातअनेक आरोपी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला व चौकशी करण्याची मागणी केली आहे,ती खुणामधील जे हत्यार कुन्हाड वापरली आहे ती जप्त करावी अशी हि मागणी त्यांनी केली आहे,।दरम्यान आरोपी गोकुळ राठोड गरीब असल्यामुळे आपल्या बचावासाठी वकीलं लावला नाही, त्यामुळे तालुका विधी सेवा समितीचे अँड,दिलीप देशपांडे यांनी आरोपी तफै बाजु मांडली पिसीआर मागणी करण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम बोडखे हजर होते,काल दि,19रोजी आरोपी गोकुळ राठोड याने झोपेत असलेले मोतीराम आडे,वय65 वर्ष रा,उपनवाडी,वंसत जेता राठोड 55वर्ष रा,कारला यांच्यावर कुन्हाडी नेघाव घालुन त्यांना जागीच ठार केले तर घरामध्ये झोपलेल्या आई,श्रीमती सुनिता विलास राठोड 45वर्ष, व बहीन कु,अस्वीनी राठोड 18 वर्ष यांच्यावर कुन्हाडीने वार करण्यात आला त्याच बरोबर घरात झोपलेले गणेश जाधव,50 वर्ष,यशोदा जाधव,45 वर्ष संजय जेता राठोड यांच्यावर सुद्धा कुन्हाडीने घावघालुन जखमी केले.

या प्रकरणी पोलीसानी आरोपी गोकुळ राठोडच्या विरुध्द भादवी,302,307,324, नुसार गुन्हा नोदवुन ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम बोडखे यांनी कालच आरोपीस गोकुळ राठोड यास अटक केली आणी आज दि,20 एप्रील रोजी आरोपीस न्यायालयात हजर करुन 27 एप्रील पर्यत आरोपी स पोलीस कस्टडी मिळविली, या दुहेरी हत्यांकाडाने यवतमाळ जिल्ह्यात सर्व नागरीकामध्ये चर्चेचा विषय बनला आहे,सदर आरोपीने कोणत्या कारणावरून किंवा कारणामुळे दुहेरी हत्याकांड घडवुन आणले या बदल लंवकरच पोलीस उलघडा करतीलंच,,?