मद्य विक्रीबाबत जिल्हा दंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

माण(दि.21एप्रिल):-कोविड-19 निमित्त प्रशासनाने दि. 30 एप्रिल पर्यंत निर्बंध लागु केले आहेत. त्यानुसार नमुना FL-2 Form E, Form E-2 व FLW-2 या अनुज्ञप्तीतून घरपोच या प्रकाराने मदय विक्री करता येईल व नमुना CL-3 अनुज्ञप्तीतून फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच या प्रकाराने मदय विक्री करता येईल, असे कळविले आहे.जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह, सातारा यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार, प्राप्त असलेल्या अधिकारान्वये, सातारा जिल्हयात खालीलप्रमाणे सुधारित आदेश जारी केले आहे.

सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत नमुना FL-2 Form E, Form E-2 व FLW-2 या अनुज्ञप्तीतून घरपोच या प्रकाराने मदय विक्री करता येईल. सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत नमुना CL-3 अनुज्ञप्तीतून फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच या प्रकाराने मदय विक्री करता येईल. कोणत्याही परिस्थितीत मदय विक्रीची दुकाने उघडून Take away किंवा पार्सल पध्दतीने दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानास भेट देता येणार नाही.

माल वाहतूकीचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये असलेने मदय उत्पादित होत असलेल्या ठिकाणापासून घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना मद्य पुरवठा करण्यासाठी वाहतूक करणेस परवानगी राहील. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED