भगवान महाविर जयंती साधेपणाने साजरा करावी– जिल्हाधिकारी शेखर सिंह

34

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.21एप्रिल):-सध्या कोविड-19 च्या दुस-या लाटेमुळे उदभवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता सातारा जिल्हयात महावीर जयंती हा सण अत्यंत साधेपणाने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन साजरा करणे आवश्यक आहे.असे जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दिनांक 27/04/2021 रोजीचे 0.00 वाजले पासून ते 24.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे आदेश जारी केलेला आहे.

महावीर जयंती लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी महावीर जयंती सण/उत्सव साजरा करावा. कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेव साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी. महावीर जयंती सण/उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

कोविड -19 च्या विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष महावीर जयंती सण/उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन व या कार्यालयाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून काही नवीन सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.