२२रुग्णांच्या मृत्युने महाराष्ट्र हादरला रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने घडली घटना मृत रुग्णांच्या नातेवाईकांना त्वरित दहा लाख रुपयांची मदत द्यावी

26
✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

नाशिक(दि.21एप्रिल):- नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याने तब्बल व्हेंटिलेटर असलेल्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली . तसेच अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली . रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा आता पूर्ववत झाला असून , या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल , अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली . महापालिकेच्या जुने नाशिक भागातील डॉ . झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला आज ता . २१ एप्रिल दुपारी १२ वाजेच्या सुमारास गळती लागली होती.

तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता . त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया गेला . गळती बंद करण्यासाठी तांत्रिक पथकाबरोबरच अग्निशमन दलाचे जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले . डॉ . झाकीर हुसेन रुग्णालयात सुमारे १५० रुग्ण दाखल झालेले होते . अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत .
ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने २२ रुग्णांना जीव गमवावा लागला . शिवाय इतर रुग्णांचाही जीव धोक्यात आला आहे . काही रुग्णांना ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णाल स्थलांतरीत करण्यात येत होते . नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने १५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रुग्णालयात पाठविण्यात आले .
कोविड रुग्णालय असतानाही रुग्णाचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले होते . याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . रुग्णांच्या मृत्यूमुळे नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशामुळे रुग्णालय परिसर हादरून गेला होता. याबाबत माहिती घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हॉस्पिटलला भेट दिली. माजी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले , की हे प्रकरण दुर्दैवी आहे . महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत वाईट आहे . सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे . आतापर्यंत अशा ८-९ घटना घडल्या आहेत . हे सरकार ‘ राम भरोसे ‘ चालले आहे.
आम्ही सतत बोलत आहोत , पण कोणताही प्रश्न असो , प्रत्येक वेळी सरकार हे प्रश्न ‘ डायव्हर्ट ‘ करते आहे . प्रवीण दरेकर म्हणाले , की या घटनेसाठी पूर्णतः महापालिका आयुक्त जबाबदार आहेत . गेल्या काही दिवसापासून ऑक्सिजनचा गोंधळ सुरु आहे . यंत्रणा आज गतीने उभे करण्याची गरज आहे . आता तरी या घटनेतून आपण धडा घेतला पाहिजे . शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी रुग्णालय तातडीने भेट दिली . मृत रुग्णाच्या नातेवाईक प्रत्येकी १० लाख रुपये ची मदत देण्याची मागणी माजी मंत्री आ गिरीश महाजन यांनी केली.