नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या गळतीमध्ये ११ रुग्णांचा मृत्यू

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.21एप्रिल):-राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना, नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या गळतीमध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनीही ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एकूण १५० रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी १३१ रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं.हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED