राम नवमी निमित्त वैदिक यज्ञाचे आयोजन

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21एप्रिल):-दिनांक 21 एप्रिल रोजी राम नवमी च्या निमित्ताने पतंजली योग समिती गंगाखेड व परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील व्यंकटेश नगर येथे वैदिक यज्ञाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. योगगुरू स्वामी रामदेव यांनी राम नवमीच्या दिवशी संन्यास दीक्षा घेतलेली असल्यामुळे पतंजली योगपीठ हरिद्वार द्वारे प्राप्त निर्देशानुसार या यज्ञाचे आयोजन संपूर्ण भारतात करण्यात आले होते. कोरोना सारख्या महामारी विरुद्ध लढण्यासाठी व वातावरण शुद्ध करण्यासाठी पतंजली परिवाराच्या वतीने सकाळी साडे आठ ते साडे नऊच्या दरम्यान वैदिक यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

हा वैदिक यज्ञ पतंजलीचे जिल्हा सोशल मीडिया प्रभारी गोपाळ मंत्री तथा पतंजली महिला योग समिती परभणीच्या जिल्हा महामंत्री प्रा. अभिलाषा मंत्री यांच्या निवासस्थानी करण्यात आला. व याचे फेसबुक लाईव्ह वरून थेट प्रक्षेपण हरिद्वार पर्यंत करण्यात आले. यज्ञाचे पौरोहित्य प्रा. अभिलाषा मंत्री व योग शिक्षक गोपाळ मंत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निखिल वंजारे ,दिपाली वंजारे, प्रकाश डीकले , चंपालाल देवतवाल, उद्धव देशमुख यांनी प्रयत्न केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED