म्हसवडकर ग्रुप’च्या वतीने म्हसवड शहरात फवारणी

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा9075686100

म्हसवड(दि.22एप्रिल):-शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे म्हसवड शहरात रोज ५० च्या दरम्यान पाॅजिटिव रुग्ण सापडत आहेत कोव्हीड सेंटर असो वा खाजगी दवाखाने हाॅस्पिटल बेड कोठेच शिल्लक नसल्याने दिडशेच्या वर नागरीक होम कॅरंनटाईन आहेत ते घरी न बसता गावभर फिरताना दिसत आहेत त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे याकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील ‘म्हसवडकर ग्रुपने’पुढाकार घेऊन शहरात फवारणी केली.

पालिका आपली जवाबदारी पाळत नाही पाॅजिटिव रुग्ण गावभर फिरुन गल्लो गल्लीतील नागरीक पाॅजिटिव करतआहेत तरी पालिका फवारणी करत नसून बाधीत घरावर फलक लावत नाही.शहरात गेली पांच दिवस जनता कर्फ्यु असून सर्व दुकानें बंद आहेत अत्यावश्यक सेवेच्या दुकानदाराचेअद्याप फोन नंबर पालिकेने दिले नाहीत नक्की पालिका प्रशासन व पदाधिकारी कोरोनाच्या संकटात काम काय करतेय असा सवाल म्हसवडकर नागरिक करत आहेत.

जनता एकत्र येवून स्व खर्चाने फवारणी करत असून ‘आम्ही म्हसवडकर’ ग्रुपच्या वतीने एल.के.सरतापे,अभिजित केसकर,परेश व्होरा,प्रशांत दोशी यांनी म्हसवड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यँत फवारणी केली.या ग्रुपने सामाजिक बांधिलकी दाखवली पण कोरोना महामारीत शहरातील जनतेला वाली कोण असा सवाल आज म्हसवड शहरातील नागरिक विचारत आहेत.पालिका आपली जबाबदारी कधी स्वीकारणार आणि शहरात कडक अंमलबजावणी आणि उपाय योजना कधी करणार.