शासकीय सेवेत सामावून १० लाख रुपये मदत व जबाबदार व्यक्तीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा

28

🔸डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची मागणी

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.22एप्रिल):- नाशिकच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन च्या टॅन्कमध्ये गळती होऊन २ते३ डझन रुग्णांचा मृत्यू झाला ही बाब फार गंभीर असून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून डॉ. माकणीकर म्हणाले की, रुग्णालयात १५० व्हेंटि पैकी १५ रुग्ण व्हेंटि वर तर १३१ रुग्ण ऑक्सिजन वर असल्याचे कळते मात्र ३डझन रुग्ण मृत्यू पावले असून मृतांच्या नातेवाईकाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे व प्रत्येकी १० लाख रुपये आर्थिक हातभार लावावा आणि जबाबदार व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही डॉ माकणीकर यांनी डेमोक्रॅटिक रिपाई च्या वतीने केली.