काँग्रेसच्या मागणीला यश म्हसवड शिंगणापूर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

27
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.22एप्रिल):-रस्ता गेली एक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते त्यामुळे वाहनधारक आणि नागरिक बेजार होत होते हि बाब सातारा जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस निलेश काटे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी प्रयत्न करून आणि मागणी केल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली.

शिखर शिंगणापूर देवस्थान हे महाराष्ट्राबरोबर कर्नाटक,आंध्र प्रदेश मधील भाविक भक्तांचे आराध्य दैवत आहे या देवस्थानाला भेट देण्यासाठी अनेक भाविक येत असतात परंतु गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे म्हसवड शिंगणापूर रस्त्यावर खडडे पडून अक्षरशः चालणं झाली होती या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता हि बाब लक्षात आल्यावर निलेश काटे यांनी यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली.
निलेश काटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली या तक्रारीची दखल घेऊन या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम चालू करण्यास बांधकाम विभाग दहिवडी यांना सांगितले.या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येत असल्याचे पाहून या रस्त्यावरून ये जा करनाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि निलेश काटे यांना धन्यवाद दिले