चंद्रपूर जिल्ह्यात (दि.22एप्रिल) रोजी 24 तासात 922 कोरोनामुक्त 1537 कोरोना पॉझिटिव्ह तर 28 कोरोना बधितांचा मृत्यू

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 922 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1537 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 47 हजार 983 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 33 हजार 524 झाली आहे. सध्या 13 हजार 760 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 44 हजार 707 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 90 हजार 409 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 44 व 56 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 65 वर्षीय पुरुष, भिवापूर येथील 50 वर्षीय पुरुष, महाकाली कॉलनी परिसरातील 58 वर्षीय महिला, अंचलेश्वर गेट परिसरातील 55 वर्षीय महिला, विवेक नगर येथील 62 वर्षीय पुरुष, नगीना बाग येथील 55 वर्षीय पुरुष, गजानन महाराज चौक परिसरातील 56 वर्षीय पुरुष, चिंचाळा येथील 70 वर्षीय महिला.घुगुस येथील 55 वर्षीय पुरुष.सिंदेवाही तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष,बरडकिन्ही येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला.चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील 40 वर्षीय पुरुष, पिंपळगाव येथील 68 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, वडाला पैकु येथील 72 वर्षीय महिला.मूल तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष,भद्रावती तालुक्यातील पंचशील नगर येथील 74 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील मोकाशी लेआउट येथील 60 वर्षे पुरुष.गडचांदूर येथील 50 वर्षीय पुरुष. राजुरा येथील 45 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील 36 व 53 वर्षीय महिला, भंडारा येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 699 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 647, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 21, भंडारा चार , गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1537 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 549, चंद्रपूर तालुका 64, बल्लारपूर 69, भद्रावती 149, ब्रम्हपुरी 119, नागभिड 29, सिंदेवाही 34, मूल 90, सावली 23, पोंभूर्णा 02, गोंडपिपरी 19, राजूरा 38, चिमूर 60, वरोरा 190, कोरपना 78, व इतर ठिकाणच्या 24 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 19 मृत्यूसह आज(22 एप्रिल) 417 नवीन कोरोना बाधित तर 354 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.22एप्रिल):- आज जिल्हयात 417 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 354 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 16936 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 12773 वर पोहचली. तसेच सद्या 3883 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 280 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 19 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय महिला अहेरी, 63 वर्षीय पुरुष कुरखेडा , 63 वर्षीय पुरुष आरमोरी, 27 वर्षीय पुरुष वडसा, 70 वर्षीय महिला पुराडा कुरखेडा, 52 वर्षीय महिला लाझेंडा गडचिरोली, 57 वर्षीय महिला गणेश कॅलोनी गडचिरोली , 55 वर्षीय पुरुष आलापल्ली ता.अहेरी , 66 वर्षीय पुरुष विदर्भ नगर ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर ,65 वर्षीय पुरुष विसारा ता.वडसा , 57 वर्षीय पुरुष ता.मुल जि.चंद्रपूर , 48 वर्षीय पुरुष राजेन्द्र वार्ड वडसा, 43 वर्षीय पुरुष सुंदरनगर ता.मुलचेरा, 30 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 50 वर्षीय पुरुष ता.कुरखेडा, 60 वर्षीय महिला ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर ,46 वर्षीय महिला सिंधीं कॅलोनी वडसा,46 वर्षीय पुरुष चामोर्शी ,75 वर्षीय महीला बर्डी आरमोरी जि. गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.42 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.93 टक्के तर मृत्यू दर 1.65 टक्के झाला.

नवीन 417 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 183, अहेरी तालुक्यातील 40, आरमोरी 28, भामरागड तालुक्यातील 10, चामोर्शी तालुक्यातील 16, धानोरा तालुक्यातील 23, एटापल्ली तालुक्यातील 20, कोरची तालुक्यातील 27, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 11, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 12, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 09 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 38जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 354 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 140, अहेरी 21, आरमोरी 20, भामरागड 19, चामोर्शी 19, धानोरा 26 , एटापल्ली 10, मुलचेरा 04, सिरोंचा 35, कोरची 11, कुरखेडा 20, तसेच वडसा येथील 29 जणांचा समावेश आहे.