पोलीस वाडीत रानडुकरांच्या हल्ल्यात चार शेतमजूर जखमी

25

🔹जखमींना आर्थिक मदत द्या– पिराजी धुळगंडे

✒️लोहा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लोहा(दि.22एप्रिल):- येथून जवळच असलेल्या पोलीसवाडी येथे मागील दोन महिन्यापासुन रानडुकरांनी धुमाकुळ घातला आहे. अद्यापही धुमाकुळ चालु आहे .आज दि.18 एप्रिल रोजी शिवारात शेती मशागतीचे कामे चालु असते वेळेस रानडुकरानी हल्ला करून 4 शेतमजुरांना जखमी केले.वर्षभर तर शेतकऱ्यांना वानर हरीण अन्य वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. याकडे वनीकरण विभाग डोळेझाक करत असून रानडुकरा सारख्या प्राण्यापासून शेतावर काम करायला गेलेल्या महिला पुरुष यांचा जीव कधी धोका जाईल सांगता येत नाही.

आणि हाच प्रकार आज समोर आला आहे. अनेक वेळा आपल्या लोहा तालुक्यात हिश्र प्राण्यांपासून यापूर्वी धानोरा मक्ता हिप्परगा आदीं भागात होऊनही पण मी करण विभाग केवळ बघ्याची भूमिका घेऊन मूग गिळून गप्प आहे. आज पोलीस वाडी येथे रानडूकरा पासून झालेल्या घटनेची माहिती वनिकरण विभागाना देण्यात आली आहे असल्याचे सरपंच प्रतिनिधी पिराजी धुळगुंडे यांनी सदर घटनेची चौकशी करून जखमीना आर्थिक मदत मिळवुन द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.