शरणपूर वृद्धाश्रमास मदतीची गरज

38

✒️अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहमदनगर(दि.22एप्रिल):- जिल्ह्यातील नेवासे येथे गरीब वृद्धांसाठी गेल्या ३ वर्षांपासून शरणपूर वृद्धाश्रम मोफत चालविण्यात येत आहे. या वृद्धाश्रमाचे प्रवर्तक श्री रावसाहेब मगर यांनी समाज कार्यातील एम एस डब्ल्यू ही पदवी संपादन केली असून नोकरीतून ५०व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांनी हा वृद्धाश्रम सुरू केला आहे. आपल्या सारख्या दानशूर दात्यांच्या सहकार्याने या वृध्दाश्रमात सध्या २० वृध्द मात्या पित्यांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडली जात आहे. मात्र कोरोना महामारीमुळे दानशूर दात्यांची संख्या कमी झाली असून वृद्धाश्रम अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षीही वृद्धाश्रम बंद पडण्याच्या अवस्थेत आला होता. पण दानशूर व्यक्ती पुढे आल्याने हा वृद्धाश्रम तग धरू शकला. आता परत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे या वृद्धाश्रमास आपणाकडून मदतीची अपेक्षा आहे. आपण या वृध्दाश्रमास वस्तू,अन्नधान्य,कपडे, साडया,फिनेल, डेटाॅल,सानिटायजर, किराणा,फॅन, काॅट-गादी,तसेच आपणाकडे जे टाकाऊ सामान आहे ते दिले दिले तरी चालेल. अधिक माहिती साठी आपण (१) सुधीरभाऊ चव्हाण, मोबाईल नंबर : 8888213511 (२)बाळासाहेब देवखिळे, मोबाईल नंबर :8329817566 (३) रावसाहेब मगर ,मोबाईल नंबर: 7775015063 यांच्याशी संपर्क साधू शकता.किंवा आपली आर्थिक मदत पुढीलप्रमाणे बँक खात्यात जमा करू शकता. संस्थेचे नाव: अक्षय ग्रामीण युवा क्रीडा व सामाजिक विकास संस्था, मक्तापूर, ता.नेवासा, जिल्हा अहमदनगर. बॅकेचे नाव: बॅक ऑफ महाराष्ट्र ,शाखा – नेवासा, खाते नंबर: 60070064850. IFCCODE: MAHB -0000147. – देवेंद्र भुजबळ. 9869484800.