चांदवडला कोविड लस घेण्यासाठी गर्दी

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.22एप्रिल):-चांदवड शहरातील जनता विद्यालय येथे शासनातर्फे कोविड लस घेण्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे,हे केंद्र अगोदर उपजिल्हा रुग्णालय परिसरात होते. जनता विद्यालयात लसीकरण केंद्र गेल्याने सुटसुटीत अंतर ठेवून लस मिळेल अशी अपेक्षा असताना नागरिकांना मात्र दिड ते दोन तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आज लसीकरण केंद्रात पहावयास मिळाले.
आज दुपारी 1 वाजेच्या दरम्यान चांदवडचे तालुका आरोग्य अधिकारी श्री पंकज ठाकरे, आरोग्य पर्यवेक्षक वाय बी जाधव यांनी लसीकरण केंद्रास भेट दिली त्यावेळी नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले की पहिल्या व दुसऱ्या डोस घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र रजिस्ट्रेशन करण्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे गर्दी वाढत आहे.

यावर पंकज ठाकरे यांनी सांगितले की नगरपरिषद मुख्याधिकारी यांचेकडे दोन शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत सांगितलं आहे,असो चांदवड नगरपरिषदेला स्वतः ची शाळाच नाही तर शिक्षक कोठून उपलब्ध होणार हाही प्रश्नच आहे. असो एक जरी कर्मचारी रजिस्ट्रेशन साठी उपलब्ध झाला तरी रांग दोन होऊन गर्दी विभागू शकेल अशी आशा नागरिक व्यक्त करीत होते.त्यानंतर दीड वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी श्री चंद्रशेखर देशमुख साहेब यांनी सुद्धा लसीकरण केंद्रास भेट दिल्याचे समजते.दरम्यान पोलीस विभागाकडून दोन गृहरक्षक दलाचे जवान लसीकरण केंद्रावर तैनात केले आहेत.

महाराष्ट्र, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED