आमदार समीर कुणावार यांनी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट ला उपलब्ध करून दिले 20 ऑक्सिजन सिलेंडर

26

✒️इकबाल पैलवान(वर्धा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-९९२३४५१८४१

हिंगणघाट(दि.23एप्रिल):- तालुक्यात कोरणा महामारी मुळे दिवसें दिवस रुग्णांची संख्या वाढत असून SDO कार्यालय हिंगणघाट येथे आढावा बैठकीमध्ये डॉक्टर चाचारकर साहेब यांनी ऑक्सीजन विषयी माहिती दिली त्यानुसार त्या ठिकाणी सुद्धा ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आहे असे लक्षात आले त्यानुसार हिंगणघाट येथील उद्योजकांना व इतर व्यावसायिकांना *आमदार समीरभाऊ कुणावार* यांनी विनंती करून त्यांच्याकडून औद्योगिक वापरात येत असलेले जंबो सिलेंडर ची मागणी केली त्यानुसार त्यांनी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट मध्ये सिलेंडर ची जुळवा जुळव करून 20 सिलेंडर जुळवले असून त्यातले 12 सिलेंडर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिले आणि भरून आणून लावण्यात आले व लगेच सुरू केले आणि उर्वरित 08 सिलेंडर त्यांना लवकरच मिळणार असून त्यामुळे जनतेला फार मोठा दिलासा मिळाला आहे.

ऑक्सीजन सिलेंडर रोज नेने आणि भरून आणणे हा विषय असल्यामुळे आता या ऑक्सिजन सिलेंडर मुळे त्यांना फार मोठा दिलासा मिळाला.मी स्वतः उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन ऑक्सीजन सिलेंडर ची पाहणी करून तेथील अधिकारी व डॉक्टर यांच्याकडून ऑक्सीजन सिलेंडर ची माहिती घेतली व रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरू झाला.त्या ठिकाणी *हिंगणघाट, समुद्रपुर तालुक्याचे SDO मा. श्री. चंद्रभानजी खंडाईत, हिंगणघाट तालुक्याचे तहसीलदार मा. श्रीरामजी मुंधडा, श्री. कोडापे साहेब, डॉ.चाचरकर साहेब, डॉ. प्रफुल पारखे, बांधकाम विभागाचे मा. श्री. पोफळे साहेब,* इत्यादी सर्व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते.