स्वतःच्या दोन एकर जमिनीवर कोविड सेंटर उभारा – अतुल भाऊ खुपसे-पाटील यांची सरकारला विनंती

97

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.23एप्रिल):-करमाळा आणि माढा तालुक्यात कोरोना हाहाकार मजवत आहे. या दोन्ही तालुक्यात चांगल्या प्रकारचे कोविड सेंटर नसल्याने रुग्णांना अकलूज, बार्शी किंवा सोलापूर येथील रुग्णालयात जावं लगत आहे. मात्र त्याठिकाणी गेल्यावर रुग्णांना बेड मिळत नाहीत आणि रुग्ण मृत होत आहेत. अशी भहावय परिस्तिथी करमाळा आणि माढा तालुक्यात निर्माण झाली आहे.याच पार्श्वभुमीवर माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळख असणारे अतुल खूपसे हे रुग्णांच्या मदतीला धावले आहेत. माढा तालुक्यातील उपळवटे या गावात खुपसेंची दोन वेकर शेती आहे.

या शेतीमध्ये कोविड सेंटर उभा करून करमाळा आणि माढा तालुक्यातील रुग्णांचा जीव वाचवा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर अधिकाऱ्यांना पत्र पाठवून केली आहे.

अतुल खूपसे यांनी रुग्णांसाठी लिहलेल्या पत्रामधून जणते विषयी प्रेम व निस्वार्थ भावना दाखविली आहे. बेमोबदला दोन वेकर जमीन रुग्णांच्या सेवेसाठी देणारे अतुल खूपसे हे सोलापूर जिल्हयातील पहिले नेते आहेत. खूपसेंची मागणी मान्य करून त्यांच्या २ वेकर जागेवर कोविड सेंटर उभा करण्याची मागणी नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

जर अतुल खूपसे यांच्या जागेत जर कोविड सेंटर उभारले तर करमाळा आणि माढा तालुक्यातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी मोठी सोय होईल. अनेक रुग्णांचा जीव वाचेल. बाहेर शहरात फिरून रुग्णांना उपचार मिळत नाहीत. पण सेंटर याठिकाणी उघडल्यास सर्व रुग्णांना व्यवस्थित उपचार घेता येतील. उपळवटे याठिकाणी कोविड सेंटर झाल्यास दोन्ही तालुक्याला सोयीस्कर होईल.