चिमूर न.प.ला निर्जतूकीकरणाचा पडला विसर

79

🔹फवारणी करण्याची युवक कांग्रेस कार्यकर्ते पप्पू शेख यांची मागणी

✒️सुयोग सुरेश डांगे(विषेश प्रतिनिधी)

चिमूर(दि.24एप्रिल):-दिवसेंदिवस शहरातील कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून चिमूर शहरात निर्जतुकीकरण करणे गरजेचे असतांना मात्र याचा चिमूर च्या नगर परिषद प्रशासना ला विसर पडल्याचे चित्र आहे. मागील वर्षाच्या कोरोना लाटेत शहराला निर्जतूकीकरण करण्यात आले होते. मात्र या वेळेस फवारणी न केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासना प्रती रोष व्यक्त केल्या जात आहे.

कोरोना सन्सर्गा ची साखळी तोडण्यासाठी चिमूर शहरात जनता कर्फ्यू, लॉकडाऊन सारख्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. तरी देखील रुग्णाची संख्या वाढतीवरच आहे. परिणामी शहरातील जनजीवन ढवळून निघाले असून भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थीतीत विशेष खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपायांची अमलबजावणी करणे नितांत गरजेचे असतांना याबाबत नगर परिषद प्रशासन मात्र उदासीन दिसून येत आहे.

त्यातच अशा गंभीर परिस्थितीत स्थानिक नगर परिषद प्रशासनाचे मुख्याधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून नागरिकांच्या आरोग्याच्या जबाबदारी चा विसर पडला असल्याची जनसामान्यांत चर्चा आहे. नगर परिषद चा कार्यकाळ मागील महिन्यात संपला असल्याने कोणीही प्रश्न उपस्थित करणारे नसल्याने मुख्याधिकारी चा मनमानी कारभार चालत असल्याचेही बोलले जात आहे.

चिमूर वशहरातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मागील वर्षी प्रमाणे शहराला निर्जतुकीकरण करण्याची व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अशा गंभीर बाबी कडे लक्ष देण्याची मागनी कांग्रेस युवा कार्यकर्ते पप्पू शेख यांनी केली आहे.