आरजीपीपीएल मध्ये राष्ट्रीय अग्निशमन सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा

🔹अग्निशमन दल जवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके ठरले लक्षवेधी

✒️गुहागर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गुहागर(दि.24एप्रिल):-केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफ च्या आरजीपीपीएल रत्नागिरी युनिटमध्ये राष्ट्रीय अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह दिनांक १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत सीआयएसएफ चे उपकमांडंट पॉल के वैफेई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोरोना काळातील नियमांचे काटेकोरपणे पालन करत साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाच्या समारोप समारंभ नुकताच आरजीपीपीएल च्या पॉवरब्लॉक येथील अग्निशमन दलाच्या परेड मैदानावर संपन्न झाला.

त्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरजीपीपीएलचे एम.डी आसिमकुमार सामंता, आरजीपीपीएलचे जी.एम एच.एस बावा, सीआयएसएफ चे उपकमांडंट पॉल के वैफेई, अग्निशमन सहाय्यक कमांडट बी आर इंदोरीया, आरजीपीपीएलचे व सहयोगी कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सीआयएसएफ अग्निशमन दलाच्या बहादूर जवानांनी वायुगळती, विमान दुर्घटना व अन्य आग दुर्घटनात आगीपासुन बचाव करतानाचे, विविध लक्षवेधी, चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या राष्ट्रीय अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाच्या दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांच्या मार्फत आरजीपीपीएल व सहयोगी कंपन्यांना, कर्मचाऱ्यांना आगीची भिषणता, धोके, आगीपासुन वाचण्याचे मार्ग, यांचे कृतीयुक्त माहीती व मार्गदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी प्रात्यक्षिक स्वरूपात देण्यात आले

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED