कत्तली साठी जनावरे वाहतुक करणारे दोघेजण ताब्यात

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

दिंडोरी(दि.24एप्रिल):-येथे पालखेड चौफुलीवर पोलीस निरीक्षक अनंत तारगे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, सहायक निरीक्षक बैरागी, पोलीस हवालदार संजय गायकवाड,  पोलीस शिपाई महेश कुमावत व होमगार्ड असे कोरोनाविषाणू च्या अनुषंगाने विनाकारण फिरणाऱ्या इसमावर कारवाई करीत असताना आयशर गाडी क्रमांक क्र.GJ-२१ W-६७१४गाडीत पाच गोवंश जातीची जनावरे त्यात 04 गाई व 01 वासरू आयसर गाडीसह एकूण 11 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

     महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, गोवंश बंदी कायदा व कोरोनाविषाणू संदर्भात असलेले कायदे व बेकायदेशीर पणे विनापरवाना कत्तल करण्याच्या इराद्याने जनावरांना इजा होईल अशा पध्दतीने दोरीने बांधुन कोंबुन ठेवुन वाहतुक करतांना तसेच कोरोना विषाणु संदर्भात मास्क वापरणे बंधनकारक असतांना महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी नाशिक यांचे आदेशाचे उल्लंघन करतांना आढळून आले यावेळी गाडी चालक  प्रभुभाई सोनुभाई वळवी वय ४० धंदा  व  संदीपभाई देवरामभाई गार्डर वय २८ धंदा मजुरी दोघेही राहणार ता.वघई जि. अहवा डांग गुजरात  याना अटक करण्यात आली .गोंवंश जनावरांना चारा पाण्याकरिता  गोशाळा येथे पाठवण्यात व्यवस्था केली