नागरिकांना आरोग्यविषयक चांगल्या सुविधासाठी बावडा येथील ग्रामीण रुग्णालय उपयोगी ठरेल- अंकिता ताई पाटील

26

🔹हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बावडा येथे ग्रामीण रुग्णालयाची उभारणी . जि. प. सदस्या अंकिता ताई पाटील यांच्या हस्ते उदघाटन

✒️गेवराई प्रतिनीधी(देवराज कोळे)

गेवराई(दि.24एप्रिल):-राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बावडा येथे उभारलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. कोरोना पार्श्वभूमीवर कोविडच्या सर्व नियमाचे पालन यावेळी करण्यात आले.

अंकिता पाटील म्हणाल्या की,’ बावडा व परिसरातील गरजू लोकांना मोफत व चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातून २०१२ साली बावडा उपकेंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालय मध्ये केले व जागतिक बँकेकडून रुग्णालय इमारतीसाठी विशेष निधी मंजूर करून हे भव्य ग्रामीण रूग्णालयात उभारले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून १७ कोटी रुपये रुग्णालयासाठीचा निधी तसेच मी बजाज ग्रुप यांच्या सीएसआर फंड मधून १० लाख रुपये किमंतीचे या रुग्णालासाठी लागणारे सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत.

या रूग्णालयामध्ये ५० बेडच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत तसेच रुग्ण, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना बाधित रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी याकरिता आपण हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेकरिता कार्यान्वित करत आहोत. असे प्रतिपादन कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे, उपसभापती संजय देहाडे, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, बावडा ग्रामपंचायतचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, सदस्य अमोल घोगरे, ग्रामसेविका पावसे मॅडम तसेच बावडा आरोग्य केंद्राचे डॉ. विनोद घोगरे व इतर मान्यवर उपस्थित होते.