नायगाव तालुक्यात शिवभोजन थाली चालू करा – साईनाथ गणपतराव पाटील कानोले

28

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.24एप्रिल):-संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आणि भयावह आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार कडून गोरगरीब कष्टकरी कामगार व हातावर पोट असणाऱ्या लोकांची सोय व्हावी व या लोकांना कोरोनाच्या काळात पाच रूपयामध्ये पोटभर जेवण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यामध्ये शिवभोजन थाळी नावाची योजना चालू केली असून या योजनेमध्ये गोरगरीब कष्टकरी कामगार दिनदलित गरीब ज्यांना की कोरोनाच्या परिस्थितीच्या काळामध्ये जेवणाची सोय नाही जेवणाची सोय होत नाही.

या परिस्थितीचा आढावा घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळीची घोषणा केली आहे परंतु आज मीतिला खूप मोठ्या प्रमाणात भयावह परिस्थिती असताना मात्र नायगाव तालुक्यांमध्ये केवळ भूकमारी ची टाईम आहे म्हणून नायगाव येथे शिवभोजन थाळी मिळावी यासाठी मुख्यमंत्री याना संदेश च्या माध्यमातून दिला निरोप मग एकदाच तालुक्यात गरीब आहेत काय असा प्रश्न उपस्थित करता राजे छत्रपती शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्धीस पत्रक दिले आहे पुढे ते म्हणाले की आज पाहिले तर या काळात आणि या वाईट परिस्थिती मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोरगरीब भुकेने मारताना दिसत आहेत परंतु याचे कुठलेही शासन प्रशासनाला गांभीर्य नसल्यामुळे या ठिकाणी फक्त नायगाव तालुक्यातील लोकांनाच भुके राहावे लागत आहे.

शिवभोजन थाळी मिळते मग नायगाव तालुक्यात का नाही आसा प्रसन्न निर्माण केला आहे तालुक्यातील सर्वात गरीब आहेत काय शासन प्रशासन या प्रवृत्तीला गांभीर्याने का घेत नाही या परिस्थितीचा आढावा घेत लवकरच नांदेड जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्याकडे समक्ष भेट घेऊन व्यथा मांडणार आहे त्यामुळे तात्काळ नायगाव तालुक्यातील शिवभोजन थाळीची चालू करावी अशी मागणी देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात राजे छत्रपती शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ गणपतराव पाटील कानोले यांनी केली आहे