बेलावडे येथे कोविड लसीकरण संपन्न

20

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.२४एप्रिल):- जिल्हा परिषद शाळा बेलावडे येथे अतिशय नियोजनबद्द कोविड१९ लसीकरनाचा कार्यक्रम संपन्न झाला . जावली तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी भगवानराव मोहिते साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सायगाव पी एच सी चे डॉ. अजय वाढते (एम ओ) व डॉ .प्रियांका पाटील (सी एच ओ ) यांचे टीमने उत्कृष्ट लसीकरण मोहीम राबवली .

आरोग्य टीमचे सहकारी धुमाळ (एच ए), पी व्ही कुलकर्णी (एम पी डब्ल्यू ), एस एम सोयाम (ए एन एम ) तसेच आशा सेविका रेश्मा शिंदे , रेश्मा दीक्षित , कांभीरे अंगणवाडी सुपरवायझर , ऑपरेटर पाटील , अंगणवाडी सेविका विमल घाडगे , मदतनीस हेमा शिंदे यांनी अतिशय सुरेख नियोजन करून १४९ नोंदणीकृत लोकांना कोविड १९ ची लस कुठलाही साईड इफेक्ट न होण्याची काळजी घेऊन दिली.

तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दळवी मॅडम व शिक्षिका पालकर मॅडम व ऑपरेटर चैताली शिंदे ताई , श्रीधर आहिरे यांनीही ऑनलाइन नोंदणीसाठी सहकार्य केले .बेलावडे गावच्या सरपंच सौ. वनिता रोकडे , उपसरपंच अजय शिंदे , ग्रामसेवक शेवाळे , पोलीस पाटील निशांत रोकडे , शिपाई अनिल शिंदे यांचे उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला .

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे , नितीन शिंदे , सुभाष पवार , बळवंत शिंदे , बापूराव गायकवाड गुरुजी, निलेश रोकडे, राहुल रोकडे , जयराज शिंदे इत्यादी आरोग्य व्यवस्थापन कमिटी व ग्रामस्थ ग्रामपंचायत बेलावडे व बौद्धजन मंडळीं यांनी लसीकरणाच्या साठी आलेल्या लोकांचे निटनिटके नियोजन केले .