“समाजकल्याण विभागाच्या योजनाबाबत माहिती” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन ; उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24 एप्रिल):-सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “समाजकल्याण विभागाच्या योजनाबाबत माहिती” या विषयावर दि. 28 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या कालावधीत चंद्रपूर,समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, अमोल यावलीकर गूगल मीटच्या माध्यमातून ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहे. तरी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

सदर ऑनलाईन मार्गदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर तथा आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यांत येत आहे.
तरी सर्व उमेदवारांनी स्वतः च्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवर गुगल मिट हे अॅप डाऊनलोड करून meet.google.com/dhg-zyye-xcs या लिंकवर जॉईन व्हावे.

अधिक माहितीसाठी 07172-270933 व 252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.