आम्ही कोरोना लस घेणार नाही

27

🔺खुटाळा येथील गावकऱ्यांचा लस घेण्यास नकार

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

नेरी(दि.24एप्रिल):-देशभरातील दुसऱ्या टप्यातील कोरोना लसीकरण (covid – 19 vaccination) मोहीम सुरू झाली आहे. 65 वर्षापुढच्या नागरिकांसाठी आणि ज्यांना इतर काही मोठे आजार आहेत अशा 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस दिली जाते आहे. मात्र खुटाळा येथील गावकरी लस घेण्यास नकार दर्शवत असून, आम्ही लस घेणार नाही अशा इशारा ग्रामपंचायत ला दिला आहे. गावातील आंगनवाडी सेविका व आशा वर्कर वगळता आतापर्यंत येथील फक्त 3 लोकांनी कोरोना लस घेतली आहे. गावकऱ्यांच्या मनात असा संभ्रम निर्माण झाला आहे की, ही कोरोणा लस घेतल्याने माणसाचा जीव जातो. कर्मचाऱ्यांना वेगळी लस दिली जाते व सर्व सामन्यांना वेगळी लस दिली जाते. ही लस घेतल्यानंतरही कोरोना होऊन नागरिकांचा जीव जातो. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

गावकऱ्यांच्या हा संभ्रम दूर करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. मात्र, तरीही नागरिकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. आम्ही घरीच राहू पण लस घेणार नाही, आमचे राशन, पाणी बंद केले तरी चालेल अश्या अनेक प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळत आहेत.
_____________________

गावकर्यांमध्ये कोरोना लस बाबत संभ्रम निर्माण होऊन, भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता स्वतः समोर येऊन कोरोना लस टोचून घ्यावी.

मंजुषा ढोरे
सचिव ग्रामपंचायत खुटाळा