कृषी खात्याने खते, बी-बियाणे, औषधी बोगस पुरवठा करणाऱ्या कंपनीचे लायसन नूतनीकरण करू नये

29

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.24एप्रिल):-महाराष्ट्रा मध्ये खते बी-बियाणे औषधी बोगस पुरवठा करणारी फार मोठे रॉकेट आहे, त्यांचे लायसन्स कृषी खात्याने नूतनीकरण करू नये असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी महाराष्ट्र शासनाकडे तक्रार द्वारे केला आहे. कारण 2018 पासून महाराष्ट्रात खते बी-बियाणे औषधी राज्यातील व परराज्यातील पुरवठा करणाऱ्या कंपनीचे फार मोठे रॅकेट कार्यरत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर बोगस पुरवठा कंपनी द्वारे अनेक तक्रारी शासनाकडे बी बियाणे, खते, औषधे संदर्भात दाखल झालेले आहेत.

त्यावर महाराष्ट्र विधान मंडळांमध्ये प्रश्न उत्तर झाले असून विविध समित्या चौकशीसाठी नेमलेल्या आहेत. परंतु आज तागायत कृषी खाते अंतर्गत खूप मोठे बोगस पुरवठा करणाऱ्या कंपनीचे रॉकेट कार्यरत आहे , त्यामुळे कंपन्यांवर कारवाई केली जात नाही असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केलेला आहे .परराज्यातील उत्पादक व विपणन कंपन्यांना महाराष्ट्रात विक्री करण्याचे परवाने कसे काय दिले जातात, कारण बियाणे कायदा 1966 नियंत्रण आदेश 1983 यामधील तरतुदीचा भंग करण्यासोबत अत्यावश्यक वस्तू अधिनियमाचे उल्लंघन केलेले आहे असा आरोप वसंत मुंडे यांनी केला आहे. महाराष्ट्रात खते बी-बियाणे औषधी कीटकनाशकाच्या अनेक बोगस कंपनी असून डीलर्स व विक्रेते द्वारे माल पुरवला जातो .

त्यांच्याकडे परवाने सध्या नाहीत परंतु कृषी आयुक्त कार्यालयाची संगणमत करून बोगस परवाने मिळवून देणारे रॉकेट कृषी कार्यालयात कार्यरत आहे.गुण नियंत्रण विभागाच्या मार्फत प्रयोग शाळेचा अहवाल मॅनेज करून बोगस लॉबी चा परवाने वितरण करण्याचा मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालेले आहेत . अनेक तक्रारी शासनाकडे शेतकऱ्यांच्या प्रलंबित असून सुक्ष्म अन्नद्रव्ये, मिश्र खते उत्पादन व विक्री परवाना यासंदर्भात कृषी आयुक्त कार्यालयात परवाना नुतनीकरण उद्योगाकडून खूप मोठ्या प्रमाणावर लाच देऊन गैरव्यवहारात केला जातो. नूतनीकरणाच्या नावाखाली मलिदा गोळा करण्यासाठी कृषी खात्याचे बोगस परवाने देण्यासंदर्भात फार मोठी अधिकाऱ्या बरोबर कंपनी धारकांची संगणमत आहे.

त्यात आमचे कुणीही काहीही करू शकत नाही अशी घमेंड या कंपन्यांना व अधिकाऱ्यांना आहे अशी तक्रार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खते बी-बियाणे औषधी च्या तक्रारीसंदर्भात चौकशी प्रलंबित जाणून-बुजून ठेवलेली आहेत . बोगस खत, बी बियाणे, औषधी मुळे शेतकऱ्यांपुढे नेहमीच दुबार पेरणीचे संकट उभे राहून आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे होत आहे तसेच बाजारपेठेतील कृषी मालाचे चढ-उतारामुळे तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तरीही कृषी खाते व शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देत नाही असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे. कृषी विभागाला खत नियंत्रण आदेश 1985 नुसार खाताचा ग्रेड सुरू करण्याचा अधिकार देण्यात आला त्यात प्रयोग शाळेमार्फत खता संदर्भात ग्रेट मान्यता दिलेले मूळ घटक प्रयोगशाळेत हव्या त्या प्रमाणात मिळतच नाहीत.

त्यामुळे खात्याच्या भरमसाठ किंमती वाढलेले असून जिप्सम, मॅग्नेशियम सल्फेट ,सल्फर कमी करून 50 किलोची गोणी तयार केली जाते. त्यात गुजरात राज्यातील फरशी पॉलिसींचे कारखाने, फरशी पावडर, दगडी कोळशाची राख मिश्र करून दाणेदार खताचे प्लांट उभे केले असून महाराष्ट्रात कृषी विभागाचे गुणनियंत्रण विभागाने कचरा पावडरच्या प्लांट चालकांना खिरापती सारखे परवाने वाटप केले आहेत , याची चौकशी झाली पाहिजे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असूनही गुणनियंत्रण विभाग राज्यभर तपासणीसाठी प्रयोगशाळेकडून आलेले नमुने उघडकीस आलेले असतानाही कारवाई करीत नाहीत महाराष्ट्रामध्ये खते बी-बियाणे औषधी परवाने 100 पेक्षा जास्त रद्द करण्यात आलेत परंतु बोगस कंपन्या तयार करून नावे बदलून परवाने खते बी-बियाणे औषधी संदर्भात कृषी विभागामार्फत देण्यात आलेले आहेत याची चौकशी झाली पाहिजे असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी मागणी केली आहे. अनेकांची न्यायप्रविष्ट प्रकरणे असून चौकशी पूर्ण झालेली नाही करिता महाराष्ट्र शासनाने कृषी विभागांतर्गत विक्री उत्पादन नूतनीकरण परवाने खते, बी-बियाणे, औषधी संदर्भात बोगस कंपन्यांना देण्यात येऊ नये अशी तक्रार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे.