खासदार अशोक नेते यांची बोथली प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

🔹कोरोना लसीचा घेतला दुसरा डोस

🔸लसीकरण केंद्राची केली पाहणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24एप्रिल):- चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी सावली तालुक्यातील बोथली प्राथमिक आरोग्य केंद्राला आज दिनांक 24 एप्रिल 2021रोजी भेट दिली.यावेळी सदर लसीकरण केंद्रावर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोवाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक अजमवार, श्री.पाल, श्री.उकडे तथा आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी खासदार नेते यांनी लसीकरण केंद्राची पाहणी केली.

अतिशय चांगल्या अशा वातावरणात कोविड लसीकरण मोहीम या ठिकाणी सुरु होती. खासदार नेते यांनी या ठिकाणी लसीचा दुसरा डोज घेण्याची इच्छा व्यक्त केली. आरोग्य सेवीका श्रीमती घसाडे यांनी त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोज दिला. खा. नेते यांनी यापूर्वी पहिला डोज संसद भवन, नवी दिल्ली येथे घेतला होता.

कोरोनावरील लस सुरक्षीत व प्रभावी असून कोरोना विरोधातील लढ्यात लस ही एक मोठं शस्त्र आहे, त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोरे येऊन लस टोचून घ्यावी व कोरोना अजारावर मात करावी, असे आवाहन खासदार नेते यांनी यावेळी केले.या कोरोना संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहे, त्यांचे हे कार्य अतुलनीय आहे. यापुढेही त्यांनी चांगले कार्य करत राहावे यासाठी आरोग्य विभागाला शुभेच्छा दिल्यात व कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करण्याच्या सूचनाही दिल्या.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED