म्हसवड शहरात मोकाट फिरणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाना लगाम लावा -किशोर सोनवणे

34

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.24एप्रिल):-कोरोनाविषाणूंच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार माजला असून गेली सात दिवस शहरात जनता कर्फ्यु लागू असून पण रुग्ण संख्येत घट होत नसून उलट त्यात वाढच होत आहे म्हसवड शहरातील कोरोना बाधित रस्त्यावर फिरत असल्याने कोरोना वाढत आहे. या लोकांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आरपीआय नेते किशोर सोनवणे यांनी केली आहे. जनता कर्फ्यु चा फुसका बार निघाला असुन पोलीस व नगरपालिका यंत्रणा यांच्यात दुर्लक्षित नियोजन व अंतर्गत समन्वय नसल्याने कोरोना प्रसार अधिक वाढत आहे.
माण तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला असून म्हसवड शहरात कोरोना रुगणाची ही संख्या अधिक वाढत आहे.वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासन पूर्णपणे हतबल झालेले आहे.

म्हसवड शहरामध्ये 14 एप्रिल ते 31 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. माण तालुक्याचे प्रांताधिकारी शैलैश सुर्यवंशी यांनी म्हसवड वासियांची बैठक घेऊन जनता कर्फ्यु चा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने लोकांच्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे आता कोरोना चा प्रसार वाढताना दिसत आहे त्यामुळे मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे.म्हसवड शहरामध्ये आत्तापर्यत दहा दिवसांत बारा रुग्णांचे कोरोणामुळे निधन झालेले आहे.होमकोरंटाईन लोक घरात न बसता फिरत आहेत व दुकाने उघडून बसत आहेत. यामुळे संख्या वाढताना दिसत आहे.
यामध्ये शहरातील वाढणाऱ्या कोरोना मुळे अधिक धोका निर्माण झालेला आहे.त्यामुळे होमक्वारंटाईन रुग्णांना मोकाट फिरण्यास वेळीच लगाम लावावा.

घरोघरी तपासणी करावी,शहरातून फवारणी करावीअशी मागणी जनतेतून होत असताना सुद्धा मात्र म्हसवड नगरपालिकेने वाड्या वस्त्यांवर निर्जंतुक औषधे फवारणी अद्याप केली नाही.
जनता कर्फ्यु करण्यापूर्वी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी यांनी शहरातील संशयित रुग्णांची तपासणी वैद्यकीय कर्मचारी यांच्या मार्फत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र संशयित रुग्ण वाढले असुनही अद्यापही तपासणी करण्यात आली नाही. यामुळे रुग्ण वाढत आहेत. कुटूबातील एक व्यक्ती बाधित असेल तर इतरांची तपासणी करण्यात येत नाही. तसेच “प्रतिबंधित क्षेत्र” म्हणून फलक लावले जात नाहीत. रुग्णांना प्रतिबंध करण्यात येत नाही. हे बाधित रुग्ण गावभर फिरत आहेत.शहरातील पोलीस यंत्रणेने सगळा भार होमगार्ड वर सोपवला आहे. शहरात कुठे ही तपासणी करण्यात येत नाही. बसस्थानक परिसरात एक शिपाई व एक होमगार्ड बंदोबस्त करत आहेत.

पोलिसांनी मोकाट फिरणाऱ्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. जे व्यापारी कोरोना तपासणी करत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी. सक्तीची कोरोना तपासणी करण्यात यावे.
कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता आता पुर्ण लॉकडाऊन गरजेचे झाले आहे.शहरातील सर्व व्यवहार बंद करुन केवळ वैद्यकीय सेवा सुरु ठेवण्यात यावी. अशी मागणी करत आहोत शहरातील मुख्य बाजारपेठेत अद्यापही काही व्यापारी दुकाने बंद करून मागच्या दारातून विक्री करत आहेत. यामुळे रुग्ण वाढ आवाक्यात येत नाहीत. उलट अनेक व्यापारी बाधित झाले आहेत. शहरातील लोकांनी आता अधिक काळजी घेतली तर कोरोना आटोक्यात येईल अन्यथा शहरात अत्यंत वाईट स्थीती होणार आहे. तर कोरोना बाधित व्यापारी दुकानात बसुन विक्री करताना दिसतात.

शहरात दवाखान्यात रुग्ण वाढत असून. म्हसवड येथील कोरोना सेंटर येथे रुग्ण वाढल्याने बेड उपलब्ध होत नाही त यामुळे रुग्णांना बाहेर शिप्ट करावे लागते आहे. तर व्हेंटिलेटर नसल्याने रुग्ण मृत्यू होत आहेत. म्हसवड येथे लोक वर्गणीतून सुरु केलेल्या कोरोना सेंटर ला लोकांनी औषधे मोफत दिली आहेत. मात्र शासनाने या सेंटर ला आवश्यक सुविधा द्यावेत. अशी मागणी आरपीआय पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
म्हसवड शहरात प्रशासनाने लक्ष घालून कोरोना आटोक्यात आणावा असे आवाहन प्रशासनास किशोर सोनवणे यांनी केले आहे.