लातूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांना रेमडेसिविर ची गरज सरपंच सेवा संघाची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

26

✒️लातुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लातुर(दि.24एप्रिल):-जिल्हयात रोज 1700 च्या पुढे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत.काही तरुण रुग्ण सुद्धा यामध्ये दगावत आहेत.अगदी कमी वयाचे रुग्णांना ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर खूप कमतरता भासत आहे. यांची नोंद घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीने आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करून आपण आमच्या जिल्ह्याला जास्तीचे रेमडेसिविर इंजेक्शन भेटावे,म्हणून मा.माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना आपण तात्काळ लक्ष देऊन जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रावर सूचना देऊन टेस्टिंग जास्तीत जास्त वाढवावे मा. मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना चर्चा करून रेमदेसिविर यांची मागणी एका पत्रकाद्वारे प्रशासनाकडे केली आहे यांची दखल घेऊन कोरोणा जिल्हा आटोक्यात आणण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करत आहे.

याबद्दल आपणास आदरपूर्वक सलाम तरी जो तुडवडा भासत आहे याकडे जाणीवपूर्वक लक्ष देवून रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी बाबासाहेब पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली लातुर जिल्हा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सरपंच बंकट बिराजदार जिल्हा समन्वयक निलेश बिराजदार यांच्या सह जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी केली आहे